हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर एखादी भन्नाट गोष्ट व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. एखाद लक्षवेधी कारण व्हायरल होण्यासाठी पुरेसं असत. सध्या मराठी सिनेसृष्टीतील आगामी चित्रपट भिरकीट मधील अशीच एक भन्नाट लावणी तुफ्फान व्हायरल झाली आहे. याआधीही अशी मराठी चित्रपटातील गाणी, संवाद, त्यांचे टीझर आणि ट्रेलर तुफान लोकप्रिय झाल्याचे आपण पाहिले असाल. पण एक वेगळाच तोरा या लावणीत पहायला मिळतोय. ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हि संस्कृती आधुनिकरित्या प्रेक्षकांसमोर भिरकिटच्या माध्यमातून अली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आगामी चित्रपट ‘भिरकीट’ चांगलाच चर्चेत आहे. ‘भिरकीट’ च्या ट्रेलरला आणि गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हि एक भारी लावणी आहे. जिचे बोल इतके भन्नाट आहेत का बस्स.. ‘डोळ्यावर गॉगल लावा की’ असे या लावणीचे बोल आहेत. या लावणीने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना तुफान हसवलंय आणि फुल्ल राडा घातला आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला गायिका उर्मिला धनगर आणि गायक मंगेश कांगणे यांनी आपला ठसकेदार आवाज दिला आहे. तर मंगेश कांगणे यांनीच या गाण्याचे बोल लिहिले आहेत. बहुचर्चित मराठी चित्रपट ‘भिरकीट’ हा येत्या १७ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
भिरकीट या चित्रपटाची स्टार कास्ट एकदम जबरदस्त आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या चित्रपटाविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ‘भिरकीट’ चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणी ही पहायला मिळणार आहे. नक्कीच हे गाणं प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.
Discussion about this post