Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काही लोकांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी..; अशोक मामांसाठी रितेशची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 4, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
RiteishD_AshokSaraf
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मराठी सिनेसृष्टीतील हृद्य सम्राट अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस आहे. आपल्या अव्वल कॉमिक टायमिंगने ज्यांनी अख्खी सिनेसृष्टी गाजवली त्या अशोक मामांचा वाढदिवस सगळ्यांसाठीच खास आहे. कारण वयाच्या पंच्याहत्तरीतसुद्धा ते तितकेच उत्साही आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. याचे विशेष आकर्षण म्हणजे हा चित्रपट मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टी गाजवलेला अभिनेता रितेश देशमुख याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. या निमित्ताने आज अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. हा व्हिडीओ मुंबई फिल्म कंपनी यांनी बनविलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या व्हिडिओसोबत रितेशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, काही लोकांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला आश्वासक वाटतं…धीर येतो. ‘अशोक सराफ’ हे तसंच नाव. अशोक मामा, तुम्ही आज पंचाहत्तरीची तरुणाई गाठली. #वेड चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न केला. आणि पहिला प्रयत्न असूनही तुम्ही आशिर्वादासारखे माझ्या पाठिशी उभे राहिलात. तुमच्या सहभागाने आम्हाला केवळ धीर नाही आला तर चित्रपटालाच धार आली आहे. मामा तुम्हाला आरोग्य, दीर्घाआयु आणि समाधान लाभो हीच निसर्गाकडे प्रार्थना!

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘वेड’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करतोय. तर यावेळी अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ते रितेशने सांगितलं. या व्हिडिओत रितेश म्हणतोय कि, “गेल्या २० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. जेव्हा ‘वेड’ चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरु होते तेव्हा कुठे तरी वाटत होतं, या चित्रपटात अशोक मामांची भूमिका असावी म्हणजे जेणेकरून अशोक मामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल. मी पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि त्यात अशोक मामा आहेत, हे सर्व स्वप्नवत आहे. अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता, मुळात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एखादा विनोदी सीन करतांना त्यांनी आपल्या अनुभवातून त्यात आवश्यक ते बदल करून त्यात जिव ओततात. एका दिग्दर्शकाला आपला लाडका अभिनेता, आपण लिहून दिलेल्या सिनपेक्षा जास्त आपल्या अभिनय कौशल्यातून देतो तेव्हा आणखी काय हवंय… आज अशोक मामांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो.”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या चित्रपटाबद्दल जेव्हा अशोक मामा बोलतात…

अशोक सराफ यांनी सांगितले कि, “जेव्हा मला कळालं ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. तेव्हा कोणता ही पुढचा मागचा विचार न करता मी होकार दिला कारण माझ्या दृष्टीने हे महत्वाचे होते कि तो दिग्दर्शक बनतोय. रितेश एक टॅलेंटेड आर्टिस्ट आहेच त्यामुळे तो दिग्दर्शन करत असतांना मला देखील काही नवीन शिकता येईल हा माझा हेतू होता आणि खरं सांगतो या चित्रपटाचे शूटिंगचा मी इतका आनंद घेतलाय, धम्माल मजा केली. रितेश हा अतिशय शांत डोक्याने सेट वर काम करत होता, कुठे ही त्याने उत्साही असल्याते दाखवलं नाही. रितेशने प्रत्येक सिनवर विचारपूर्वक काम केलं आहे. असे शांत डोक्याने काम करणारे फार कमी दिग्दर्शक आहेत आणि मला वाटतं रितेशच्या रूपाने आपल्याला नवीन दिग्दर्शक मिळाला आहे. ‘वेड’ हा चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे यात काहीच शंका नाही. आणखी एक बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे रितेशची वाइफ जिनिलिया मराठीत पदार्पण करत आहे. तिने पण मराठी समजून घेऊन उत्तम काम केले आहे. या सर्व अनुभवातून एकच सांगावेसे वाटते की माझ्या आयुष्यात एक चांगला चित्रपट केल्याचा फील मला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश म्हणून मला एक चांगला मित्र भेटला असं मी म्हणेल.”

Tags: ashok sarafBirthday Special PostInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group