हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच कोरोनाचा संसर्ग कमी होतोय असे दिसून येत असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. इतकेच नव्हे तर सामान्यांपासून ते राजकीय दिग्गज मंडळी आणि आता अगदी बॉलिवूडमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः कार्तिकनेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. यामुळे आपल्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी तो चाहत्यांशी शेअर करताना सोशल मीडियाचा वापर करताना दिसतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा कोरोना झालाय हे सांगण्यासाठी त्याने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करीत कार्तिकने हि पोस्ट शेअर केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय कि, सगळं इतकं पॉझिटिव्ह चालू होत कि कोव्हिडला रहावलं नाही.
कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टवर त्याचे मित्र, चाहते सगळेच कमेंट्स करीत त्याच्या प्रकृतीची विचारणा करताना दिसत आहेत. कार्तिकने पोस्ट शेअर करताना भले कॉमिक अंदाजात शेअर केली असेल पण पोस्ट वाचल्यानंतर चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. अलीकडेच २० मे २०२२ रोजी कार्तिकचा भूलभुलैया २ प्रदर्शित झाल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या भुलभुलैय्या चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटातील आमी जे तोमार हे गाणे नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आले. या गाण्यातील कार्तिकचा अंदाज चांगलेच चर्चेत आहे.
Discussion about this post