हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गोड अशी बोल्ड आणि बिनधास्त आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूडकरांचा नामांकित पुरस्कार पटकावला आहे. सईला हिंदी सिनेमात तिने साकारलेल्या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट म्हणजे क्रिती सॅनॉनचा ‘मिमी’. या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी साई ताम्हणकरला IIFA २०२२ मध्ये सन्मानित करण्यात आले. अबू-धाबी येथे सुरू असलेल्या IIFA सोहळ्यात सईने मराठी सिनेसृष्टीचा झेंडा फडकावला आहे. यासाठी तिचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.
सईने सोशल मीडियावर आपल्या ट्रॉफीसोबत फोटो शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शन लिहिले आहे. तिने यात लिहिलंय कि, प्रथम नेहमीच खास असतात! स्वप्ने आणि आकांक्षांनी भरलेली एक कलाकार म्हणून, ज्या पात्रासाठी तुम्ही खूप मेहनत केली आहे त्या व्यक्तिरेखेला ओळखले जाणे आणि हे सर्व प्रेम मिळणे ही एक चांगली भावना आहे. शमा माझ्यासाठी नेहमीच प्रिय भाग असेल! तिची भावना आणि मैत्री साजरी केल्याबद्दल @iifa धन्यवाद! माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल @laxman.utekar सरांचे आभार. @rohanshankar06 तुमच्या अप्रतिम शब्दांसाठी. अशा आश्चर्यकारक अनुभवासाठी @maddockfilms. @kritisanon मिमी म्हणून सर्वात पात्र विजयासाठी! आणि @pankajtripathi सर लुडोसाठी. आणि विजयासाठी मतदान केलेल्या प्रत्येकासाठी, मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करते!
गतवर्षी ‘मिमी’ हा कॉमेडी आणि फुल ड्रामा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर रोहन शंकर यांनी चित्रपटाचे सहलेखन केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉनने मुख्य मिमी हे पात्र साकारले आहे. यामध्ये क्रिती एका विदेशी जोडप्यासाठी सरोगेट आई बनण्याचा निर्णय घेते आणि पुढे हीच गोष्ट वेगवेगळी वळणे घेताना दिसते. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण याची स्टार कास्ट होती. या चित्रपटात क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत तर पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स आणि एडन व्हायटॉक हे सहाय्यक भूमिकेत आहेत.
Discussion about this post