हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोणत्याही विषयावर बेधडक बोलणारी अभिनेत्री कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. तसं ट्रोलिंग तिच्यासाठी काही नवीन नाही. पण एखाद्या चित्रपटामुळे किंवा त्यातील भूमिकेमुळे ट्रोलिंग होणे थोडे वाईटच. अलीकडे तिचा ‘धाकड’ हा ऍक्शन सिनेमा रिलीज झाला होता. हा चित्रपट आला कधी आणि गेला कधी हेच कळलं नाही. कारण प्रेक्षकांनी सिनेमाला नापसंती दिल्यामुळे चित्रपट चांगलाच तोंडावर आपटला. जवळजवळ ८० करोडचं बजेट असलेला हा सिनेमा इतक्या सहज आपटला कि त्याचा विचार करणेही नकोच. यानंतर मात्र सोशल मीडियावर उठलेलं ट्रोलिंगच वावटळ काही थांबेनास झालंय. त्यात कंगनाने सारवा सारव करणारी एक रील पोस्ट इंस्टावर शेअर केली आहे आणि ट्रोलिंग आणखीच वाढलं.
‘धाकड’च्या रिलीजआधी या अॅक्शन स्पाय स्टोरीची चांगली चर्चा रंगली होती. वाटत होत कि एजंट अग्नीच्या माध्यमातून कंगना बॉक्स ऑफिस गाजवेल पण असं काही झालं नाही. उलट हा चित्रपट सपशेल आपटला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर कंगनाची आणि तिच्या भूमिकेची खिल्ली उडवली. त्यामुळे कंगनाने यासंदर्भात स्पष्टिकरण देणे सोयीचे समजले आणि तिने थेट इंस्टा रील शेअर करत ‘धाकड’ च्या अपयशासाठी दुसरी कितीतरी कारणं आहेत असे म्हटले. यानंतर ट्रोलिंग थांबेल असे कंगनाला वाटले होते पण लोकांनी तर आम्ही आणखी एका फ्लॉपची वाट पाहतोय म्हणत आणखीच ट्रोल केलं.
कंगनाने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरील स्टोरीत एक आर्टिकल शेअर केलं आहे. या आर्टिकलचं नाव ‘भारत की बॉक्स ऑफिस की क्वीन’ आहे. यासोबत तिने यात लिहिलंय कि, ”२०१९ मध्ये मी ‘मणिकर्णिका’ सिनेमा केला जो १६० करोड कमावत सुपरहिटच्या रांगेत जाऊन बसला. २०२० वर्ष कोरोनानं पछाडलं होतं. २०२१ मध्ये मी माझ्या संबंध करिअरमधला सगळ्यात मोठा हीट ठरलेला ‘थलाइवी’ सिनेमा केला. जो ओटीटावर प्रदर्शित झाला होता आणि त्याला खूप चांगला रीस्पॉन्स मिळाला”.”मी खूप नकारात्मक गोष्टी सहन केल्या, पण २०२२ मध्ये ‘लॉकअप’ या ब्लॉकबस्टर ठरलेल्या शो चं होस्टिंग मी करुन दाखवलं. आता वर्ष अजून संपलेलं नाही, खूप आशा आहेत”.
कंगनामुळे ‘धाकड’ तोंडावर आपटला अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. यामुळे कंगनाव्यतिरिक्त ‘धाकड’ सिनेमात दिसलेले कलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्यासह दिग्दर्शक रजनीश घई आणि निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रिलीजदिवशी १ करोड यानंतर सिनेमागृहातून याचे शो आउट करण्यात आले. याविषयी अनेकांनी सोशल मीडियावर कंगनाला पिसून काढलं. कुणी कंगनाची भूमिकेला नाव ठेवत आहे तर कुणी कंगनाच्या वागणुकीवर प्रश्न उठवीत आहेत. तर कुणी ती हिंदूंना डिवचले म्हणून सिनेमा फ्लॉप झाला अशी म्हणतंय. अद्याप हे ट्रोलिंग कायम असल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post