Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

यश आणि नेहा बांधणार साताजन्माची रेशीमगाठ; मालिकेत लग्न विशेष सप्ताहाला सुरुवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर प्रसारित होणारी अत्यंत लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ एका अनोख्या वळणावर येऊन पोहोचली आहे. यश एक बिजनेस टायकून असून तो एका सर्व सामान्य मुलीच्या प्रेमात पडतो. पण हि मुलगी एका मुलीची आई असते. एका गोड मुलीच्या संगोपनात ती तीच संपूर्ण आयुष्य विलीन करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे प्रेमाचे अंकुर कधी फुलू लागतात तेच कळत नाही. यानंतर प्रेमाचा स्वीकार करूनही आपल्या मुलीचा स्वीकार होणार का अशी धाकधूक घेऊन नेहा चौधरींच्या आयुष्यात प्रवेश करते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यशचे आजोबा आणि चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा जगन्नाथ चौधरी आपल्या नातवावरील प्रेमापोटी सगळं काही हरायला तयार असतात पण संस्कारांची कास धरून. अशातच त्यांची तब्येत बिघडते यानंतर यश आणि नेहाला परीच सत्य बराच काळ लपवून ठेवावं लागत. अखेर एके दिवशी हे सत्य उघडकीस येत आणि आजोबा – नातवाचं नातं संपुष्टात येत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पण इवलीशी परी आणि तिची आई नेहाला हे मान्य नसतं. त्या आजोबांशी बोलतात आणि आजोबांच्या मनाला पाझर फुटतो. ते सगळं काही विसरून राग रुसवा सोडून यश नेहा आणि परीचं नातं स्वीकारतात.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

इतकंच नव्हे तर परीचा आपली पणती म्हणूनही स्वीकार करतात. यानंतर आता मालिकेत लगबग सुरु आहे ती यश आणि नेहाच्या लग्नाची.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आजोबांनी परीला स्वीकारल्यानंतर आता यश आणि नेहाचा साखरपुडा एकदम जोरात पार पडतो. त्यांच्या साखरपुड्यापासून आता लग्नापर्यंतचे सगळे एपिसोड हे विशेष असणार आहेत. मुख्य म्हणजे हा संपूर्ण सप्ताह यश आणि नेहाच्या लग्नासाठी राखीव असेल. हा सप्ताह लग्न विशेष सप्ताह म्हणून झी मराठीने जाहीर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे तुम्ही व्हा तय्यार..! आजपासून पुढे ७ दिवस हा लग्न सोहळा जंगी साजरा होणार आहे. यात थोड्या कुरघोडी असतील, थोडे डावपेच, थोडं प्रेम तर थोड्या भावुक भावना असतील. हा सप्ताह मिश्र भावनांचा असेल. पण अखेर यश आणि नेहाचं लग्न होतंय हे इतकंच चाहत्यांसाठी पुरेसं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील मुख्य भूमिका यश, नेहा आणि परी यांची स्टारकास्टही जबरदस्त आहे. यश चौधरीच्या भूमिकेत मराठी अभिनेता श्रेयस तळपदे दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by निहार निर्मला नंदकिशोर तांबडे (@_nihar_tambde_6895)

तर नेहा कामतच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. याशिवाय चिमुकली परीची भूमिका इंस्टा स्टार मायरा वैकुळ साकारतेय. तर जगन्नाथ चौधरींची भूमिका याआधी मोहन जोशी साकारत होते. यानंतर काही कारणास्तव त्यांनी मालिका सोडल्यानंतर हि जबाबदारी अभिनेते प्रदीप वेलणकर त्यांच्या अनुभवानुसार उत्तमरित्या पेलताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/tv/CebR2zFJYBt/?utm_source=ig_web_copy_link

यश आणि नेहाचा लग्न विशेष सोहळा हा १२ जून २०२२ रोजी असणार आहे आणि परिचय आईचं लग्न आहे. त्यामुळे तुम्ही नक्की यायचं असा तिचा आग्रह आहे. काय मग येताय ना यश आणि नेहाच्या लग्नाला…. ?

Tags: marathi serialMayra VaikulMazi Tuzi ReshimgathPrarthana BehereShreyas talpadezee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group