हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक कथानक अव्वलरित्या प्रेक्षकांसमोर आणण्याचा ध्यास दिग्दर्शकांनी घेतला आहे. त्यामुळे विषय भावनिक असो, गंभीर असो, आव्हानात्मक असो किंवा ऐतिहासिक असो तो उत्तम पद्धतीने कलाकृतीतून साकारला जातो. गेल्या काही दिवसांपासून ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाची चर्चा आहे.
हा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणारा आहे. गेल्यावेळी या चित्रपटाची केवळ घोषणा केली होती. यानंतर आता त्यामध्ये कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासा झाला आहे. तर या लघुपटात सौरभ गोखले हा सावरकरांच्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे अशी माहिती मिळतेय आणि त्याचा फर्स्ट लूकदेखील समोर आला आहे.
हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून अभिनेते मनोज जोशी भूमिका साकारणार आहेत. तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. हा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर बेतलेला असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार..? अशी उत्सुकता प्रत्येकालाच होती. तर आता प्रतीक्षा संपली आहे आणि मराठी अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे अशी माहिती तसेच त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
या लघुपटात सौरभ गोखले, मनोज जोशी, तेजस बर्वे यांच्याशिवाय अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार यांच्या इतर मात्र अत्यंत महत्वपूर्ण अशा सहयोगी भूमिका या लघुपटात आहेत. लवकरच ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात वा शहरात करायचे असल्यास अमोघ पोंक्षे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन निर्मात्यांनी केले आहे
Discussion about this post