हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी कंगना संपूर्ण जगभरात एव्हाना प्रसिद्ध झाली असेल. कारण कोणत्याही मुद्द्यावर बोलायला आजपर्यंत कंगना मागे हटल्याचे पहायला अद्याप तरी मिळाले नाही. अलीकडेच तिचा धाकड हा चित्रपट तोंडावर पडला पण कंगनाने आपली बेधडक भूमिका सोडली नाही. यासाठी तिचे करावे तितके कौतुक थोडकेच अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिल्या. यानंतर आता तिने भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तिची परखड भूमिका स्पष्ट केली आहे.
एकीकडे नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभर आणि अगदी विदेशातही उमटले असल्याचे दिसून येत आहे. हा वाद एकीकडे चांगलाच चिघळताना दिसतोय. तर यावर आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने उडी मारली आहे. तिने या प्रकरणी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. कंगना अनेकदा बॉलिवूडपासून राजकीय मुद्द्यांवर बोलत असते हे तर सगळ्यांनाच माहित आहे. यावेळीही तिने या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत नुपूर शर्मा यांना सढळ पाठिंबा दिला आहे.
कंगनाने आपलय अधिकृत इन्स्टास्टोरीवर लिहिलं आहे कि, नुपूर शर्मा याना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या धमक्या मला दिसत आहेत. ते दररोज हिंदू देवांचा अपमान करतात म्हणून आम्ही न्यायालयात जातो. कोणीही डॉन बनण्याचं कारण नाही. हा अफगाणिस्तान नाही. आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेद्वारे चालणारे सरकार आहे. हे फक्त त्यांच्यासाठी मी लिहितेय जे लोक सारखं ही गोष्ट विसरतात. दरम्यान, नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जगभर उमटले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अल कायदाचे एक धमकीचे पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्लीसह मुंबई, गुजरात आणि यूपीमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात अली आहे.
या धमकीच्या पत्रात लिहिले आहे कि, आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. पैगंबर मुहम्मदचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मुहम्मद यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. तो त्याच्या घरात लपू शकणार नाही किंवा सुरक्षा दलही त्याला वाचवू शकणार नाही असे अल कायदाने म्हंटल.
Discussion about this post