Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

निसर्गाच्या सानिध्यात कंगनानं बांधलं सुंदर हिमाचली घर; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Kangana Ranaut
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हि अनेकदा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळेच चर्चेत राहिली आहे. ती कधी कोणत्या विषयावर काय बोलेल याचा काहीही नेम नसतो हे खरं. पण ती एक उत्तम प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि कलेची विशेष जाण तसेच आदर करणारी व्यक्ती आहे हि बाबदेखील तितकीच खरी आहे. आता नुकतेच तिने तिच्या मनाली स्थित घराचा विस्तार केला आहे आणि त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यामध्ये तिने हिमाचल परंपरा आणि तिथले सौंदर्य सारं काही दर्शविण्याचा एक प्रांजळ प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हे फोटो शेअर करताना अभिनेत्री कंगना रनौत हिने कॅप्शनमध्ये आपल्या हिमाचल घराचे विशेषत्व सांगितले आहे. यात तिने लिहिलं कि, सर्व डिझाईन प्रेमींसाठी येथे काहीतरी आहे, ज्यांना सजावट आवडते आणि पर्वतीय वास्तुकलाबद्दल उत्सुकता आहे जी स्थानिक परंतु प्राचीन आणि खोलवर पारंपारिक आहे…. मी एक नवीन घर बांधले आहे ते माझ्या मनालीमधील सध्याच्या घराचा विस्तार आहे. परंतु यावेळी ते अस्सल ठेवले आहे. विशेषत: नदीचे दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बनविलेले पर्वतीय शैली. मी हिमाचली पेंटिंग्ज, विणकाम, रग्ज, एम्ब्रॉयडरी आणि लाकडी कारीगिरी देखील समाविष्ट केली आहे…. पहा, ही छायाचित्रे हिमाचलीतील एका अत्यंत प्रतिभावान छायाचित्रकाराने क्लिक केली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

यानंतर पुढे आणखी एक पोस्ट तिने केली आहे. यामध्ये कंगना स्वतः एका जिन्यावर उभी दिसते. पण त्या जिन्यामागील भिंत आपलं लक्ष ओढून घेते. या भिंतीवर कंगनाने हिमाचलचे सौंदर्य दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. तिने हे फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ही भिंत हिमाचलसाठी एक औचित्य आहे, ती विविध परंपरा, कला आणि लोक आहे…. ही सर्व छायाचित्रे हरनाम @photovila1 ने क्लिक केली आहेत, त्याने मला ही भिंत सजवण्यासाठी मदत केली. कंगनाने शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंमध्ये तिचं नवं घर हिमाचली प्रतिभेचे समर्थन करीत असल्याचे दिसून येते. तिचं नवं घर अतिशय सकारात्मक आणि सुंदर असल्याचे या फोटोतून दिसत आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostKangana RanautManaliSocial Media PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group