हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड आणि टॉलीवुड गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे हि तिच्या अभिनयामुळे गेल्या काही काळापासून फार चर्चेत आहे. अलीकडे तिचे सलग चित्रपट रिलीज झाले असून तिची लोकप्रियता टप्प्याटप्प्याने वाढताना दिसत आहेत. अशातच आता पूजाने एक ट्विट केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. हे ट्विट काही आगामी प्रोजेक्ट किंवा अन्य वैयक्तिक माहिती देणारे नाही तर इंडिगो एअर लाइन्सविषयी आहे. तिने एका विमान कर्मचाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. एरवी लहान सहान गोष्टींवर मी ट्विट करत नाही असेही ती म्हणाली आहे. मग यावेळी ट्विट का केले..? हे जाणून घेऊ.
Extremely sad with how rude @IndiGo6E staff member, by the name of Vipul Nakashe behaved with us today on our flight out from Mumbai.Absolutely arrogant, ignorant and threatening tone used with us for no reason.Normally I don’t tweet abt these issues, but this was truly appalling
— Pooja Hegde (@hegdepooja) June 9, 2022
अभिनेत्री पूजा हेगडेने ट्विटरवर एक ट्विट करीत लिहिले आहे कि, “IndiGo6E या विमानाने मुंबईहून प्रवास करताना विपूल नकाशे नावाच्या कर्मचाऱ्याने आम्हाला अत्यंत वाईट वागणूक दिली. तो आमच्याशी विनाकारण उद्धट आणि धमकीच्या स्वरात बोलत होता. हे अतिशय वाईट आहे. मी एरवी अशा समस्यांवर ट्विट करत नाही पण हे खरच फार वाईट होतं’, असंही तिने यात म्हटलंय. यानंतर इंडिगो एअर लाइन्सकडून पूजाची वैयक्तिक पातळीवर माफी मागण्यात आली असल्याचेहि पूजा पुढील ट्विटमध्ये सांगितले.
Thanks 4 apologising for his behaviour but honestly the first apology should go to my costume assistant towards whom he discriminated against and lastly us. Everyone deserves to be treated with respect,irrespective of where they come from or who they are.There’s a way to talk 1/2
— Pooja Hegde (@hegdepooja) June 9, 2022
या ट्विटमध्ये पूजाने लिहिले आहे कि, या वागणुकीबद्दल माफी मागितली यासाठी मी आभारी आहे. परंतु प्रामाणिकपणे पहिली माफी माझ्या पोशाख सहाय्यकाची (Costume Asistant) मागितली गेली पाहिजे. ज्यांच्याशी त्याने आमच्यासोबत असतानाही भेदभाव केला. कोण कोठून आले आहेत किंवा कोण आहेत याची पर्वा न करता प्रत्येकाला आदराची वागणूक मिळायलाच हवी. शेवटी बोलायची एक पद्धत असते.
Thank you for meeting our staff at arrivals. Passenger safety and convenience are of utmost importance. We have taken your feedback and will work towards it. We look forward to serving you on many more 6E flights.~Kritika pic.twitter.com/yptMdrSW5u
— IndiGo (@IndiGo6E) June 10, 2022
याशिवाय आणखी एक ट्विट करीत पूजाने लिहिले आहे कि, पर्सची गणना मोठ्या सामानात केली जाऊ शकत नाही. शिवाय, कोणत्याही वैध कारणाशिवाय, तुम्ही केवळ शक्ती प्रदर्शन म्हणून एखाद्याला विमानातून खाली उतरवण्याची धमकी देऊ शकत नाही. या ट्विटचा मुद्दा फक्त एव्हढाच आहे कि, कुणीही आपल्या सत्तेचा दुरुपयोग करू शकत नाही आणि सर्व लोकांना समानतेने तसेच दयाळूपणे वागवले जावे.
🕯🕯🕯 pic.twitter.com/M24jzuiLbP
— Pooja Hegde (@hegdepooja) May 27, 2022
अभिनेत्री पूजा हेगडेच्या या सलग ट्वीट्सनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलंय कि, तू एक सेलिब्रिटी असून जर तुला अशी वागणूक मिळते तर आम्हाला काय वागणूक मिळेल किंवा सर्वसामान्यांना काय वागणूक दिली जात असेल याची कल्पनाच करवत नाही. इतकेच नव्हे तर एका व्यक्तीने आपली इंडिगो प्लेनची तिकीट कॅन्सल केल्याचे सांगितले आहे. हा प्रसंग अतिशय वाईट असून हे चुकीचे आहे अश्याही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. अभिनेत्री पूजा हेगडे दाक्षिणात्य सिनेमासह बॉलिवूडमध्येही आघाडीच्या पथावर कार्यरत अभिनेत्री आहे. अलीकडेच तिचा राधे श्याम आणि बिस्ट असे दोन चित्रपट चांगलेच हिट गेले आहेत.
Discussion about this post