हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक कलाकार आपल्या चेहऱ्यावर विविध रंगाचे पोत मिरवीत मनातल्या भावना मनातच दाबून प्रेक्षकांसमोर प्रेक्षकांसाठी त्यांना हवा तास वावरत असतो. पण त्याच्या या हालचालींमागे एक सत्य दडलेले आहे जे गेली कित्येक वर्ष अबोल आहे. आज मराठी सिनेइंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे मराठी सिनेमा, बॉलिवूड सिनेमा अगदी टॉलिवूड सिनेमाही करतात. याशिवाय रंगभूमीवर विविध नाटकांचे प्रयोग घेऊन ते अवतरतात. यांपैकी एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे भरत जाधव. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘सही रे सही’ या नाटकाचे तो यशस्वी प्रयोग करत आहे. आजही प्रेक्षक त्याच्या अभिनयासाठी कडाडून टाळ्या वाजवतात. तेव्हाचाच हा एक प्रसंग त्यानेही प्रेक्षकांनाच नव्हे तर भरतलाही खंत व्यक्त करायला भाग पाडले.
भरत जाधवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने एका मोठ्या विषयाला हात घालत भावनांना वाट दिली. भरतने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये काही चाहत्यांच्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यातील एका चाहत्याने लिहिले आहे कि, “स्वानुभव… भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो.
त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दिड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली.”
हे संपूर्ण ट्वीट शेअर करत भरत जाधव याने लिहिलं कि, ‘नाट्यगृह व्यवस्थापन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.’ सध्या त्याचं हे विधान चांगलाच चर्चेत आलं आहे. आतापर्यंत भरत जाधव याने नाटक, मालिका विविध सिनेमा अश्या माध्यमातून आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने कायम प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवले आहेत. गेल्या काही काळापासून भरत जाधव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत जाधव आल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
Discussion about this post