हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारत आणि पाकिस्तान यांचं मैत्र्यप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे यांच्यात कधी युद्ध होईल ते सांगता येत नाही. तरीही परराष्ट्र म्हणून अनेकदा भारताने पाकिस्तानच्या छोट्या मोठ्या कुरघोड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पण यावेळी त्यांनी निर्लज्जपणाचा कळसच गाठलाय म्हणायला हरकत नाही. प्रसिद्धीसाठी कोण काय करेल ते सांगता येत नाही. मात्र एखाद्या राष्ट्राने असे काही करणे त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही हे हि तितकेच खरे. पाकिस्तानात एका हॉटेलमध्ये ग्राहक बोलवण्यासाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हीचा गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील मधील एक व्हिडिओ लावला आहे. त्या व्हिडिओमध्ये आलिया ‘आजा ना राजा’ असं म्हणून बोलावताना दिसते. या व्हिडिओच्या सहाय्याने हॉटेलमध्ये गिऱ्हाईक ओढून आणण्याची काही भलतीच आयडिया यांनी लावलीये.
https://www.instagram.com/p/Ce6ZHcaoSsd/?utm_source=ig_web_copy_link
पाकिस्तानमधल्या एका हॉटेलच्या बाहेर लावलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी थोडीच सोडणार आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहताच पाकिस्तानवर संतापत सडकून टीका केली आहे. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे कि, अशाप्रकारे एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपमान करणे तुम्हाला शोभत नाही. हे कृत्य विकृतीजन्य आणि किळसवाणे आहे. त्यातही कहर म्हणजे हा व्हिडिओ पाहून जे पुरुष ग्राहक त्या हॉटेलमध्ये जातात त्यांना २५ टक्के सुट दिली जातेय. गेल्या सोमवारी संबंधित हॉटेलच्या मालकाने ही ऑफर सुरु केली. आज आठवडा झाला तरीही हि ऑफर चालूच आहे. या ऑफऱवर लिहिलयं की, आजा ना राजा, किसका इंतजार है! हा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील शेअर करण्यात आला आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली.
https://www.instagram.com/tv/Ce5f2gVooJJ/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओतील हा प्रसंग संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि गाजलेला चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’मधला आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा जाहीर निषेध करणाऱ्या अनेक कमेंट्स दिसून येत आहेत. कुणी कडाडून टीका करतंय तर कुणी अर्वांच्य भाषेचा वापर करताय. एकूणच या व्हिडिओवर पडलेल्या कमेंट्स या कृत्यावर संतापलेल्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या आहेत हे दिसून येत आहे. कराचीमध्ये असणाऱ्या या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आलियाच्या या व्हिडिओचा वापर करणे अतिशय चुकीचे आहे. सोशल मीडियावर याबाबत वाद उफाळल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही हा व्हिडिओ दाखविण्यात येतोय हीच काय ती खंत.
Discussion about this post