हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम कलाकृती इंडस्ट्रीला दिल्या. रंगभूमीवर भरीव योगदान देणाऱ्या आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून लोककलेची परंपरा त्यांनी शिकली आणि तो वारसाही त्यांनी जपला. यानंतर शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आजोबांसोबत मारलेल्या गप्पा त्यांचे किस्से केदार नेहमीच प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात. लोककला, नाटक, चित्रपट, मैत्रीचे आणि शिवसेनेचे अनेक किस्से आजतागायत त्यांनी सांगितले आहेत. अशीच एक शिवसेनेशी असलेल्या नात्याची आठवण आणि त्यातही खंत व्यक्त करणारी एक पोस्ट त्यांनी केली आहे. ज्याचं शीर्षक शाहीर आणि शिवसेना असं आहे.
शाहीर आणि शिवसेना…आज शिवसेनेचा स्थापना दिवस…जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…ठाकरेकाका ( बाळासाहेब ठाकरे ) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं…बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं…फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा…पश्चीम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा…शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं “आंधळं दळतयं ” मुक्तनाट्य…जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल…बाबांचे आणि ठाकरे काकांचे ट्याप होणारं फोन संभाषण…दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनीकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून ” बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस ” म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना…
शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा…ऐशी टक्के समाजकारण आणि वीसटक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं…आज हे सर्व आठवतय…शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरेकाकाही आठवतायत…पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लीहीला जाईल तेंव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल…मात्र बाबांना श्रध्दाजली वाहाताना उध्दव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत हे ही कमी नाही…आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलय…शिवसेना शतायु होवो…मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो…..”जय महाराष्ट्र – लेखिका वसुंधरा साबळे.
Discussion about this post