हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिच्या नावाचा समावेश आहे. खूप कमी काळात साराने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहे. त्यात गेल्या काही काळापासून तिने एका पेक्षा एक भारी चित्रपटांमधून आपले वर्चस्व दाखवले आहे. शिवाय ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. यामुळे तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. आता अलीकडेच तिने केलेलं एक जबर बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
साराच्या व्हायरल फोटोंमध्ये तिने परिधान केलेलं ड्रेस अतिशय लक्षवेधी आहे. पांढरी बॉर्डर असलेला हा काळा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर डेव्हिडने तयार केला आहे. हाच डिझायनर ड्रेस साराने परिधान केल्यानंतर ती कमाल दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव तर होतच आहे. याशिवाय साराचे इंडस्ट्रीतील मित्र आणि मैत्रिणी देखील या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत आहेत. साराचा बोल्ड अवतार हा सगळ्यांसाठी अवाक करणारा आहे. मात्र साध्या लूक नंतर या बोल्ड लुकमध्ये देखील साराचे सौंदर्य तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यात यशस्वी झाले आहे.
साराच्या या व्हायरल फोटोशूट वर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये अगदी प्रियांका चोप्रा पासून अनन्या पांडे पर्यंत अनेक सेलिब्रिटी नावांचा समावेश आहे. तिच्या बोल्ड लूक इतकंच तिच्या कॉन्फिडन्सचंसुद्धा विशेष कौतुक केलं जातं आहे. कुणी तिला ब्युटीफूल म्हणत आहे तर कुणी स्टनिंग. इतकंच काय अनेकांनी तर हा ड्रेस तिच्याच साठी बनला असावा अशाही कमेंट्स केल्या आहेत.
Discussion about this post