Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वयाच्या चाळीशीनंतरही अभिनेत्री दिसतात सुंदर; काय आहे त्यांच्या ब्युटीचं रहस्य..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bollywood Actress
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| तुमची आवडती अभिनेत्री अतिशय सुंदर दिसते ना..? मेकअप आणि झगमगत्या दुनियेत तीच भारी अस वर्चस्व असण्यामागे तीच सौंदर्य देखील आहे. तुम्हालाही तिच्यासारखं सुंदर आणि लक्षवेधी दिसावं असं वाटणं फार साहजिक आहे. पण रोजची धावपळ आणि जीवनशैली त्यांच्यासारखं जगू देत नाही. मग प्रश्न पडतो अरेच्चा! ही तर वयाची चाळिशी पार करून गेली आहे तरीसुद्धा इतकी सुंदर कशी काय दिसते. तर आज आपण आपल्या सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींच्या सुंदरतेचे रहस्य जाणून घेणार आहोत.

आज दिनांक २१ जून असून आज संपूर्ण जगभरात योग दीन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे एकमेव उद्देश्य म्हणजे लोकांना योगाचे महत्व समजायला हवे. आता हे सांगण्यामागील कारण म्हणजे तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्री नियमित योगाभ्यास करतात आणि हेच ते सुंदरतेचे रहस्य. होय. योगा केल्याचे अनेक फायदे आहेत. शरीर सुदृढ राहते, लवचिक बनते, चेहऱ्यावर चमक येते. याचा फायदा अभिनेत्रींना त्याच्या कारकीर्दीत होतो.

० नियमित योग करणाऱ्या अभिनेत्री

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

१) शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी सध्या ४७ वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य विशीच्या मुलींसारख आहे. सेलिब्रिटींमध्ये तिनेच योगासन करण्याची सुरुवात केली. योग गुरू बाबा रामदेव यांच्या सोबतही योगासनं केली आहेत. ती ओटीटी आणि इंस्टाग्रामवर योग क्लासेस घेते. आपले प्रियजन आणि चाहते यांना ती नेहमीच योगा करण्यास प्रेरित करत असते.

 

View this post on Instagram

A post shared by Sarva – Yoga Studios (@sarvayogastudios)

२) मलायका अरोरा – मलायका खान ही नेहमीच आपल्या फिटनेस साठी चर्चेत असते. मलायका ४८ वर्षांची असली तरी तिची बॉडी आणि चेहरा तीच वय सांगत नाहीत. कारण ती नियमित न चुकता स्वत: योग करते. अगदी कठीण योगासने देखील ती सहज करते आणि योगा करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करते. सोशल मीडियावर मलायकाची योग सीरिज आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

३) करिना कपूर खान – करिना कपूर खान ही ४१ वर्षांची असून तिला तैमूर आणि जहांगीर अशी दोन लहान मूल आहेत. पण मुल झाली म्हणून काय झालं? ती नेहमीच तंदुरुस्तीला प्राधान्य देते. बाॅलिवूडमध्ये साइज झीरोचा ट्रेंड आणणारी करिना आज झिरो फिगर नसली तरीही अतिशय सुंदर दिसते. गरोदर पणांनंतर तीने वजनावर नियंत्रण मिळवलं आहे आणि आता ती एकदम फिट दिसते.

 

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

४) बिपाशा बासू – बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एक स्टनिंग अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू. बिपाशाच्या दिवसाची सुरुवात देखील योगानेच होते. आज ४३ वर्षांची असूनही बिपाशा फिट दिसते. सध्या सिनेविश्र्वापासून दूर आहे पण ती नियमित योगा करते आणि स्वतःला फिट ठेवते.

Tags: bipasha basuKareeena Kapoor KhanMalaika AroraShilpa Shettyyoga
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group