हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या झी मराठी वाहिनीवर काही मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. यामध्ये मन उडू उडू झालं आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकांचा समावेश आहे. तर सासू-सून, कौटुंबिक हेवेदावे, मत्सर यापलिकडे जाऊन प्रेक्षकांना काही वेगळ्या प्रकारचं मनोरंजन देणारा रिअॅलिटी शो किचन कल्लाकार देखील प्रेक्षकांचं लाडका कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम चमचमीत, अस्सल चवींच्या पाककलेवर आधारीत असल्यामुळे गृहिणींनी या कार्यक्रमाला विशेष पसंती दिली आहे. मात्र आता लवकरच हा कार्यक्रम निरोप घेऊन एक नवा कार्यक्रम आपल्या भेटीस येतोय. हा एक डान्सिंग रिॲलिटी शो असणार आहे. ज्याचं नाव ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर’ असे आहे.
किचन कल्लाकार या शोचे दोन पर्व झाले आणि ही दोन्ही पर्व चांगलीच गाजली. या शोमध्ये विविध दिग्गज मांडली आली होती. कुणी मनोरंजन सृष्टीचा भाग होत तर कुणी राजकीय क्षेत्राचा भाग होत. अशा अनेक दिग्गज मंडळींनी आपल्या हातची चव महाराजांना चाखवली आहे. कलाकारांचं खाद्यप्रेम दाखवणारी ‘किचन कल्लाकार’ ही मालिका झी मराठीवर बुधवार आणि गुरुवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होते. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण नाराज होण्याचं कारण नाही. एक संपणार तर दुसरी सुरू होणार. होय. झी मराठीवर लवकरच लहान मुलांसाठी ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर’ हा नवा डान्सिंग रिॲलिटी शो सुरू होतोय. त्यामुळे आता महाराष्ट्र पुन्हा एकदा लहानग्यांच्या तालावर थिरकणार आहे. लवकरच या कार्यक्रमासाठी ऑडिशन सुरू होणार आहेत.
किचन कल्लाकार या अतिशय लोकप्रिय झालेल्या मालिकेचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अतिशय खास शैलीतून करत होता. त्याने अगदी सक्षमपणे ही जबाबदारी पेलली होती. त्याचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडत. तसेच प्रशांत दामले हे या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसून महाराज ही भूमिका साकारत होते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत काही बदल सातत्यानं घडत होते. प्रशांत दामले यांच्याऐवजी निर्मिती सावंत परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसल्या. तर कधी संकर्षण नाटकाच्या दौऱ्यात असल्यामुळे त्याच्या जागी श्रेया बुगडे दिसली. प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या तू म्हणशील तसं आणि सारखं काही तरी होतंय या नाटकांचे प्रयोग लंडनला असल्यामुळे ते दोघेही व्यस्त आहेत. यांच्या व्यग्र शेड्युल्डमुळे कार्यक्रमावर परिणाम झाला. बहुदा त्यामुळे ही मालिका आटोपती घेण्याचा निर्णय निर्मात्यांनी आणि वाहिनीनं घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अशी अधिकृत घोषणा अद्याप वाहिनीनं केलेली नाही.
Discussion about this post