हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अफेअर, लिव्हिंग, रेल्सशनशिप, ब्रेकअप हे सगळं मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी काही वेगळं नाही. यामुळे अशा बातम्या वाचल्या कि हे काय रोजचंच आहे असं सहज तोंडून निघत. पण घटस्फोट….? हा विषय थोडा गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्या अनेक बातम्यांनी नुसतं थैमान घातलं होत. यामुळे अशाही बातम्यांची वाचकांना सवय आहे. पण एखाद्या लाडक्या आणि आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात असं प्रापंचिक वादळ आलं तर साहजिकच याचा परिणाम चाहत्यांवर होतो. अशीच काहीशी कुणकुण सिद्धार्थ जाधवच्या बाबतीत लागली आहे.
होय. आपला लाडका सिद्धू सध्या प्रापंचिक वादळात पिसतोय का काय..? अशी चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे अशा चर्चाना उधाण आलय. याच कारण म्हणजे सिद्धार्थची पत्नी तृप्तीने तिच्या अधिकृत सोशल हॅण्डलवरून तृप्ती जाधव काढून तृप्ती अक्कलवार असं केलंय.
तिनं जाधव आडनाव का काढलं..? ते घटस्फोट घेत असतील का अशा चर्चा लगेच सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आपल्या दोन्ही मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्याने तसे फोटोही शेअर केले पण यामध्ये एकही फोटोत पत्नी तृप्ती नव्हती. अगदी तेव्हापासून सगळे विचारात पडले आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या २ वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. पण याबाबत कोणीतीही अधिकृत माहिती सिद्धार्थ आणि तृप्तीकडून मिळालेली नाही. अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्ती यांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी २००७ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना स्वरा आणि इरा नावाच्या दोन गोड मुली आहेत.
सिद्धार्थ आणि तृप्तीने डान्सिंग रिऍलिटी शो झलक दिखला जा’मध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा सर्वानाच तृप्ती आणि सिद्धार्थची केमिस्ट्री भावली होती.
सिद्धार्थ नेहमीच तृप्ती बद्दल भरभरून बोलतो. मग आत असं काय झालं असेल..? कि थेट वेगळं होण्याचा विचार त्यांनी केला आहे. तशी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसली तरीही चाहत्यांना चिंता वाटणे साहजिक आहे.
Discussion about this post