हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अशा अनेक घडामोडी सुरु आहेत ज्यांचा थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदावर परिणाम होत आहे. एकीकडे शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेतील निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारणे हि घटनाच मुली कुणाला मान्य नाही. तर दुसरीकडे याच विषयाला अनुसरून कित्येक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या मस्करी, चेष्टा त्याहीपलीकडे काही गंभीर विषयांची चाळण करू पाहणाऱ्या मीडियाला अभिनेता क्षितीश दाते याने खडे बोल सुनावले आहेत. अभिनेता क्षितीश दाते याने धर्मवीर चित्रपटात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
अभिनेता क्षितीश दातेने अधिकृत इंस्टा स्टोरीवर एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये क्षितीशचा ‘धर्मवीर’मधील लूक शेअर केला आहे. तसेच ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं यात लिहिलंय. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.” एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने संताप व्यक्त केलाय.
‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितीशने उत्तम साकारली आहे आणि हि भूमिका लोकांनाही आवडली आहे. या चित्रपटामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली हे निश्चित. त्यामुळे साहजिकच त्याने संताप व्यक्त करणे योग्य आहे असे अनेकांचे मत आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्याचे चित्र दिसून आले आहे. सध्या हे सर्व आमदार आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत अशी माहिती मिळतेय. राजकीय विश्वात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. सगळेच एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे दिसून येत आहे. राजकारणाबाबत प्रत्येकाच्या विविध प्रतिक्रिया असतात. पण मिम्स बनविणाऱ्यांची कल्पना काही औरच असते. एकीकडे शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात असतात नेटकरी मात्र मिम्सवर खुश आहेत असे चित्र दिसत आहे.
Discussion about this post