हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याचा प्रत्येक चित्रपट काहीस वेगळं कथानक घेऊन येताना दिसतो. तसाच एक फुल्ल थ्रिलर चित्रपट घेऊन लवकरच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा एकत्र प्रेक्षकांसमोर येत आहेत. बॉलिवूडचा आगामी थ्रिलर चित्रपट ‘हिट – द फर्स्ट केस’ हा लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर या गुरुवारी सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे.
‘हिट – द फर्स्ट केस’ या चित्रपटाच्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अभिनेता राजकुमार राव हा पोलीस विभागाचा सर्वोत्कृष्ट पोलीस म्हणून दिसतोय. तो होमिसाइड इंटरव्हेंशन टीमचा एक भाग म्हणून या चित्रपटात दिसतोय. अर्थात खुनाच्या गुन्ह्यांची उकल करणारी हि टीम चित्रपटात थ्रिल आणते. या चित्रपटाच्या कथानकानुसार, महामार्गावर एका गाडीतील मुलगी बेपत्ता होते तिला शोधायचं आहे. पण त्याचवेळी राजकुमार याचा भूतकाळ समोर येतो आणि तो त्याला त्रास देतो. यात तो स्वतःशी झुंजताना हरवलेल्या मुलीला शोधू शकेल.? याच उत्तर या चित्रपटात मिळेल.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा राजकुमार राव सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या पात्राचे नाव नेहा असे आहे. ती राजकुमार साकारत असलेल्या कॉप पात्राची गर्लफ्रेंड दाखवली आहे. यात नेहादेखील बेपत्ता आहे. हा संपूर्ण चित्रपट एक अन्वेषणात्मक क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. या सिनेमात अभिनेता दिलीप ताहिल, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला आणि संजय नार्वेकर यांच्याही अन्य मात्र मुख्य अशा महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ‘हिट – द फर्स्ट केस’ नामक तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. शैलेश कोलानू यांनीच तेलगू आणि आता हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिल राजू, कृष्ण कुमार आणि कुलदीप राठौर यांनी केल आहे. तर हा चित्रपट १५ जुलै २०२२ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post