हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो भारतीय बलात्कार संस्कृती हे नुसते शब्द बोलायचे झाले तरीही जीभ जड झाली का काय असे वाटत आहे ना..? फारच विचित्र आणि भेदक अशी भावना आहे या शब्दात. विचित्र वाटणारी हि शब्दरचना फक्त एकाच नजरेतून पाहिली जाते हे काय ते वाईट. कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते त्यामुळे संस्कृती शब्दाकडे त्याच विचाराने पहिले जाते. पण संस्कृती हे केवळ सुंदर, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या परंपरा आणि चालीरीतींचे नाव नाही. तर ‘बलात्कार संस्कृती’ म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था ज्यात लोक बलात्काराच्या पीडितेला पाठिंबा देत नाहीत तर बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. याच अबोल विषयाला वाचा फोडणारा टॉक शो घेऊन अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे येत आहे.
या टॉक शोचा विषयच भारतीय बलात्कार संस्कृती असा आहे. यात बलात्कार संस्कृतीचा संदर्भ असा आहे कि, बलात्कारासाठी स्त्रीला जबाबदार धरण्याची जुनी रीत आहे. त्यामुळे हि एक अशी संस्कृती आहे ज्यामध्ये बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचार याकडे गंभीर गुन्हा नव्हे तर किरकोळ दैनंदिन घटना म्हणून पाहिले जाते.
अशाच भारतीय बलात्कार संस्कृतीवर रेघोट्या मारायला आणि अबोल विषयाला बोलते करायला अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे व्हीमास मराठीच्या ‘राडा राडा’ या टॉक शोमध्ये आपल्या भेटीस येणार आहेत. बलात्कार या प्रकाराला मुळापासून आळा घालण्यासाठी या अभिनेत्री सल्लामसलत करताना दिसणार आहेत. यातून आपल्याला नक्कीच मोलाचं ज्ञान मिळणार यात काहीच शंका नाही.
अभिनेत्री प्राजक्ता आणि पूर्वा व्हीमास मराठीच्या राडा राडा या शो अंतर्गत प्रेक्षकांना सामाजिक विषय कसा हाताळायचा याबाबत मार्गदर्शन करतील. तर व्हीमास मराठीचा राडा राडा हा शो प्रत्येक एपिसोडमध्ये नवा विषय घेऊन येणार आहेत. नवनवे कलाकार, विचारवंत यांची मत यात घेतली जातील. रविवार २६ जून २०२२ पासून हा टॉक शो सुरु झाला आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतोय, कल्चर्ड, भारताच्या रेप कल्चर्ड बद्दल बोलतोय.. राडा राडा आता बाईवरच्याअत्याचाराविरुद्ध डंके की चोट पर बोलतोय..’राडा राडा’ हा सत्य परिस्थिती सांगणारा व्यंगात्मक शो आहे अशी व्ही मासने याची ओळख करून दिली आहे.
Discussion about this post