हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित ‘अनन्या’ हा चित्रपट येत्या २२ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे! असे म्हणत जगण्याचा नवा कानमंत्र देणारी ‘अनन्या’ लवकरच तुमच्या भेटीस येतेय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. डोळ्यात टचकन पाणी आणणारा हा ट्रेलर अनेकांना जगण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे. या चित्रपटात ‘अनन्या’ हि आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे साकारत आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया ‘अनन्या’चे निर्माते आहेत.
या ट्रेलरमध्ये स्वप्नांसाठी जगणारी ‘अनन्या’ एका अपघातात तिचे दोन्ही हात गमावते. मात्र ती आयुष्य थांबवत नाही तर स्वतःच्या पायावर उभी राहते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना हृता म्हणाली कि, ‘ ज्यावेळी ‘अनन्या’साठी माझी निवड झाल्याचा फोन आला, आधी मला विश्वासच बसत नव्हता. काही दिवस हे खरं आहे, हे मनाला समजवण्यात गेले. कारण ‘अनन्या’च्या निमित्ताने माझे चित्रपटात पदार्पण होणार होते. पहिलाच चित्रपट एवढा मोठा, याहून आनंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही. या भूमिकेसाठी मला शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच गोष्टींवर काम करावे लागले. प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
https://www.instagram.com/p/CfUHpkrpPpW/?utm_source=ig_web_copy_link
पुढे म्हणाली कि, अर्थात यात मला अनेकांची साथ लाभली. ‘अनन्या’चा प्रवास माझ्यासाठी सुद्धा खूप आव्हानात्मक होता. या चित्रपटातून म्हणजेच ‘अनन्या’कडून मी काही गोष्टी शिकले त्या म्हणजे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानून आयुष्य पुढे न्यायचे आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. आयुष्यात हे जमले तर आपले आयुष्य सुखकर होते.’ याशिवाय निर्माते रवी जाधव म्हणाले कि, ‘हे नाटक जेव्हा मी पाहिले तेव्हाच या नाटकाचे चित्रपटात रूपांतर व्हावे, अशी माझी इच्छा होती आणि आता ती पूर्णत्वास येत आहे. मला आनंद आहे या चित्रपटाचा मी एक भाग आहे.’ अनन्या या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनन्या साकारली आहे.
Discussion about this post