हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाचा मौसम म्हणजे अनेकांच्या मनामनात कवी जन्म घेत असतात. हा मौसमच असा असतो कि टपरीवरचा चहा मस्त खरपूस भाजलेलं कणीस आणि कांदा मूग भजीचा आस्वाद आहा.. बस इतना हि काफी है! पण सध्या पावसाळ्यापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती राजकीय सत्ता संघर्षाची. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ सगळ्यांच्या चाय पे चर्चाचा विषय झालाय. अशातच शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल ऑडिओने नुसता हशा पिकवलाय. ‘काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..एकदम ओक्के मधीहाय’ हे वाक्य एव्हढं गाजतंय का काय विचारायला नको. दरम्यान मजेचा भाग सोडून या विषयाकडे गांभीर्याने बघा सांगणारी एक कविता अभिनेते आणि कवी सौमित्र यांनी सादर केली आहे.
या वाक्यावर न जाणे कित्येक मिम्स बनले आणि व्हायरल झाले. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील शहाजीबापूंना या डायलॉगची फर्माईश केली होती. पण यानंतर अखेर कुठेतरी अंकुश लागायला हवाच ना. मका मस्ती आणि गंमत जंमत एक बाजूला तर राजकीय उलथा पालथीचा सर्व प्रभाव एक बाजूला आहे. म्हणून सौमित्र यांची कविता वाचण्यासारखी तितकीच समजण्यासारखी आहे. सध्या त्यांची ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
सौमित्र यांचे काव्य पुढीलप्रमाणे आहे.. कवी म्हणतो,
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष
काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास
काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब
काय मतदार काय कॉन्स्टीट्यूएन्सी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता
काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे
काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं
काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिकन् काय आस्वादक
काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर
काय फेसबुक काय वॉट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर
काय युपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार
काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
– सौमित्र”
Discussion about this post