हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या १० दिवसात महाराष्ट्राच्या इतिहासात बऱ्याच न पाहिलेल्या गोष्टी घडल्या. सत्तानाट्यात आता सत्ता संघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेच्याच काही बड्या नेत्यांनी बंडखोरी केली आणि सरकार पाडलं. यांनतर महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला. बुधवारी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गुरुवारी मुख्यमंत्री झाले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सारं पाहून अनेकांनी आक्रोश व्यक्त केला तर शिंदे समर्थकांनी जल्लोष. याच समर्थकांपैकी एक म्हणजे आरोह वेलणकर.
हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…!
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
सत्ता नाट्याची सुरुवात झाल्यापासून अभिनेता आरोह वेलणकर हा महाविकास आघाडी सरकारच्या मागे जणू हात धुवून लागल्याचे पाहायला मिळाले. उठता बसता ट्विटरवर व्यक्त होताना तो मविआ सरकारवर नुसता टीकांचा वर्षाव करीत होता. यानंतर अखेर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे सरकार स्थापन केले. यानंतर सर्वत्र कौतुक आणि टीका होताना दिसल्या. अनेकांनी नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यात अगदी उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत अशा बड्या नेत्यांचा आणि अनेक कलाकारांचा समावेश आहे.
Abhinandan!! 🤗🤟🏽 https://t.co/FTOA85JLwq
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 30, 2022
या आनंदक्षणी आरोह वेलणकर याने आपला आनंद व्यक्त करणारे ट्विट करीत एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र सोबतच त्याने महाविकास आघाडीवर टीका करणे काही सोडलेले नाही. तर शुभेच्छांच्या जोडीला मविआ वरील टीकांची किनार जोडली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने ‘महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय’ अशी टीका त्याने केली होती. तर अडीच वर्षात महाविकास आघाडीतील दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातात हे किती दुर्दैवी आहे. अजूनही कारवाया सुरूच आहेत. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे, असेही तो म्हणाला होता.
Congratulations to @Dev_Fadnavis and @mieknathshinde with your leadership our state is bound to fly high and cover up the lost ground in the last 2.5 years. All the best. Looking forward. 🇮🇳
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 30, 2022
याचाच संदर्भ देऊन त्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलंय कि, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र यशाचे शिखर गाठो. तसेच गेल्या अडीच वर्षात झालेले नुकसान भरून काढा. खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच पुढे जात राहा’
Discussion about this post