हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही काळापासून चांगलीच चर्चेत आहे. हास्यजत्रेची सूत्रसंचालक ते रानबाजारची रत्ना आणि आता ‘वाय’ सिनेमा यामुळे सगळीकडे फक्त आणि फक्त प्राजक्ताच चर्चेत आहे. शिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे सोशल मीडियावर ती विविध फोटो, व्हिडीओ आणि रिल्स शेअर करणे पसंत करते. अनेकदा ती चाहत्यांशी संवादही साधते. सध्या तिने लोणावळा ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील संपूर्ण टीम एक मोठी सुट्टी काढून लोणावळा येथे मस्त फिरायला गेली आहे आणि याच ट्रिपचे हे फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.
मराठी मालिका विश्वातील नामांकित नाव सोनी मराठी. या वाहिनीवरील अत्यंत गाजणारी मालिका म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अगदी कोरोनाच्या काळातही या मालिकेचे शूट सुरु होते आणि यातील कलाकारांनी प्रेक्षकांना हसवले. गेली २ ते ३ वर्षे न थांबता सलग ते काम करत आहेत. म्हणूनच त्यांनी यावेळी पूर्ण १ महिन्याची सुट्टी घेतली आहे. या सुट्टी दरम्यान सगळे एकत्र लोणावळ्याला मस्त फिरायला गेले आहेत. यावेळी प्राजक्ताने निसर्गाच्या सानिध्यांत जाऊन कमाल असं फोटोशूट केल आहे. शिवाय पावसाळा हा ऋतू प्राजक्ताचा आवडता रुरु असल्यामुळे ती हि ट्रिप पूर्ण मनासारखी अनुभवतेय. पण मज्जा सांगायची झाली तर प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्समध्ये एकच कमेंट धुवाँधार कोसळतेय. ज्यामुळे प्राजक्ताच्या फोटोंपेक्षा कमेंट जास्त चर्चेत आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये पावसामुळे झालेला हिरवागार निसर्ग, डोंगर, घनदाट जंगल असं सगळं पहायला मिळतंय. हे फोटो पाहून एखाद्याने उत्साही आणि आनंदी कमेंट केल्या असत्या. पण चाहत्यांनी तर कहर केलाय. चाहत्यांनी या फोटोवर केलेली कमेंट तुम्हाला अलीकडेच झालेल्या सत्ता नाट्याची आठवण करून देईल. अलीकडे एका आमदाराने ‘काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील. एकदम ओक्केच’ असे विधान केले होते. याचाच आशय घेत चाहत्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलंय कि, ‘काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे.’
Discussion about this post