Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘न कळता..’; ऋता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ चित्रपटातील रोमँटिक गाणे रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 4, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ananya
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित ‘अनन्या’ हा चित्रपट येत्या २२ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे! असे म्हणत जगण्याचा नवा कानमंत्र देणारी ‘अनन्या’ लवकरच तुमच्या भेटीस येतेय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. डोळ्यात टचकन पाणी आणणारा ट्रेलर चांगलाच गाजल्यानंतर या चित्रपटातील रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे बोल ‘न कळता आज..’ असे काहीसे आहेत. या चित्रपटात ‘अनन्या’ हि भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे साकारत आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया ‘अनन्या’चे निर्माते आहेत.

‘अनन्या’ चित्रपटातील हे रोमँटिक गाणे सोशल मीडियावर चांगले चर्चेत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता चेतन चिटणीस हे या गाण्यात मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. त्यांच्यातील खुलणारे प्रेमाचे नाते या गाण्यात दाखवले आहे. ‘न कळता’ असे या गाण्याचे बोल असून या रोमँटिक गाण्याला प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सुमधूर आवाज लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे आणि समीर साप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्यात नायक आणि नायिकेला एकमेकांविषयी असलेल्या प्रेम भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे गाणे प्रेमी युगुलांसाठी खास ठरणार आहे.

या रोमँटिक गाण्याविषयी भावना व्यक्त करताना चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड म्हणाले कि, ‘हृता आणि चेतनवर हे गाणे चित्रित करण्यात आले असून अभिषेकने हे गाणे अगदी साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे मनाला मोहून टाकणारे आहे. आपल्या साथीदाराची प्रत्येकवेळी साथ मिळणे किती महत्त्वाचे आहे हे या गाण्यामधून स्पष्ट होत आहे.’ याशिवाय निर्माते संजय छाब्रिया म्हणाले कि, ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच चित्रपटासोबत संगीतालाही दर्जेदार बनवण्याच्या प्रयत्नात असते. मला खात्री आहे, या गाण्याला आजची तरुणपिढी चांगला प्रतिसाद देईल.’

Tags: AnanyaHruta DurguleRomantic SongViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group