हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बंगाली सिनेसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शन क्षेत्रासाठी हा एक मोठा दुःखद धक्का मानला जात आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे आज सोमवार, दिनांक ४ जुलै २०२२ रोजी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, निधनादरम्यान तरुण मजुमदार ९२ वर्षाचे होते. त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. तरुण मजुमदार यांनी १९८५ मध्ये अलोर पिपाशा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
Saddened to learn about the demise of Veteran Bengali Filmmaker #TarunMajumdar. His classics like Dadar Kirti, Balika Badhu are eternally imbibed in our hearts and earned him 4 National Awards & Padma Shri in 1990.
Prayers and condolences to the bereaved family and his fans. RIP
— Jagdeep Dhankhar Vice-President of India (@jdhankhar1) July 4, 2022
तरुण मजुमदार यांनी बंगाली चित्रपटांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक दर्जा कलाकृती बंगाली सिनेसृष्टीला दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपटातून नेहमीच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. तरुण मजुमदार यांच्या प्रत्येक चित्रपटाचे कथानक हे रंजक, लक्षवेधी, आकर्षक आणि सामान्य प्रेक्षक वर्गाला भावतील असेच राहिले आहे. रिपोर्टनुसार, तरुण मजुमदार यांचे वय ९२ असून त्यांचे निधन हे वृद्धापकाळाने झाले. मात्र ते विविध व्याधिनी ग्रासले होते अशीही माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोलकाता येथील एसएसकेएम या सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र अखेर हि झुंज थांबली आणि सोमवारी त्यांचे निधन झाले.
मुजुमदार यांनी उत्तम कुमार, सुचित्रा सेन, छबी बिस्वास, सौमित्र चटर्जी आणि संध्या रॉय अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. बालिका बधू, कुहेली, श्रीमन पृथ्वीराज, दादर कीर्ती, गणदेवता, आलो अशा अनेक अव्वल चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचा गणदेवता हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बंगाली चित्रपट ठरला. तर तरुण मजुमदार यांना १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Discussion about this post