हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असतात. अलीकडेच ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुकले चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याबाबत नेहमीच उत्सुकता असते. आपल्या कामात नेहमीच १००% देताना लहान मोठे अपघात अनेक कलाकारांनी पाहिले आहेत. अनुभवले आहेत. असाच एक अपघात अनुपम खेर यांच्यासोबतही घडला आहे. आगामी चित्रपट ‘कागज २’ च्या सेटवर चालू शूटिंगदरम्यान अनुपम यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि ते जखमी झाले. मात्र वेळीच लक्षात आल्यामुळे तात्पुरते शूट थांबवून उपचार करण्यात आले.
या घटनेशी संबंधित एका खात्रीशीर सूत्राने दिलेली माहिती अशी कि, कोर्टातील एका सीनचे शूटिंग सुरू होते. या सीनदरम्यान अनुपम खेर चुकून जखमी झाले. सूत्रानुसार, या चित्रपटातील हा एक महत्त्वाचा कोर्ट रुममधला सीन होता आणि अनुपम खेर आपल्या भूमिकेत पू्र्णपणे सामावलेले होते. मात्र सीन चालू असताना त्यांनी समोरील टेबलावर आपलं डोकं आपटलं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या डोक्याला जखम झाली आणि रक्त येऊ लागले. यांनतर सेटवरील प्रत्येक जण त्यांच्याकडे धावून गेला. ते ठीक आहेत ना अशी प्रत्येकालाच धास्ती होती.
सूत्रांनुसार, सेटवर दर्शन कुमार आणि सतिश कौशिक देखील हजर होते. यावेळी प्रत्येक जण अनुपम यांच्या जखमेतून फार रक्त वाहू नये याची प्रार्थना करत होते. देवाच्या कृपेने अनुपम यांना फार दुखापत झाली नसून ते ठीक आहेत अशी माहिती मिळत आहे. दरम्यान अनुपम आपल्या डोक्याला सूज येऊ नये म्हणून लगेच आइसपॅकने शेकवत होते. निर्मात्यांनी शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले होते मात्र अनुपम यासाठी तयार झाले नाहीत. त्यांनी फक्त आईसपॅक लावण्यापुरतं थांबून आजुबाजूचं गंभीर वातावरण हलक-फुलकं करीत शूट सुरु केलं.
Discussion about this post