हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद हि तिच्या अतरंगी फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. नेहमीच एकापेक्षा एक बोल्ड आणि जगापेक्षा काहीतरी वेगळीच फॅशन घेऊन ती चाहत्यांसमोर येत असते. दररोज नवीन पोस्ट आणि नवं ट्रोलिंग हि जणू तिची दिनचर्या झाली आहे. पण सध्या तिची इंस्टावरील स्टोरी फारच चर्चेत आहे. हि पोस्ट म्हणजे हद्दच झाली. उर्फीच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर फिरत होती. त्यातच उर्फीला एक अशी पोस्ट मिळाली जी पाहून तिने इन्स्टा स्टोरी शेअर केली आणि सांगितलं कि मी जिवंत आहे. हि पोस्ट सोहळा मीडिया पोस्ट समजायचं कि जीवे मारण्याची धमकी हेच कळत नाही.
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक स्क्रीन शॉट शेअर केलाय. यामध्ये २ फोटोंचा एक कोलाज करून शेअर केला आहे. यातील एकात उर्फीच्या गळ्यात रशी बांधलेली दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तिची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिलेली दिसते आहे. हा फोटो कैलाश राज नावाच्या एका नेटकऱ्याने फेसबूक पोस्टमध्ये शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘RIP उर्फी जावेद’ जिच्या जाण्यानं कोणाचंही नुकसान झालेलं नाही’. तसंच, त्याने असं देखील लिहिलं आहे की, ‘माझं उर्फीच्या खुन्याला समर्थन आहे’. हे सगळं काही अनपेक्षित आहे. अशा पद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट करणं फारच विचित्र आहे असे अनेकांनी म्हटले आहे.
उर्फी जावेदने हा स्क्रीन शॉट इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे. सोबत लिहिलं आहे की,”या जगात काय घडत आहे..? मला जिवंत मारुन टाकण्याच्या खूप धमक्या मिळाल्या आहेत आणि आता हे. माझ्या खुन्याला त्याचं समर्थन आहे, असं देखील हा महाभाग लिहितो आहे, मूर्ख कुठला”. या फोटोमध्ये उर्फीच्या गळ्यात रशी टाकली आहे आणि तो फोटो एडिट केलाय. जणू उर्फीने फाशी घेऊन जीव दिलाय. पण या फोटोचे खरे सत्य म्हणजे उर्फीने नेहमीप्रमाणे नवीन स्टाइलच्या नादात लोखंडाच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या. यामुळे तिच्या मानेला दुखापत झाली होती.
Discussion about this post