हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपटांचे कथानक, ऍक्शन आणि कलाकरांचा अभिनय, त्यासह भव्य दिव्य शूटिंग सेट नेहमीच लक्षवेधी ठरतात. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने रेकॉर्ड ब्रेक कामे केली आहे. हा सिनेमा दिवसेंदिवस एकावर एक रेकॉर्ड करतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडल्यानंतर आता या सिनेमाने अनेक हॉलिवूड चित्रपटांचा पछाडत यंदाचा HCA Midseason Award उपविजेता म्हणून पटकावला आहे.
And the winner of the HCA Midseason Award for Best Picture goes to…
Everything Everywhere All At Once
Runner up: RRR #HCAMidseasonAwards #A24 #EverythingEverywhereAllAtOnce @A24 @EEAAOA24 pic.twitter.com/PMrxkgWVQ1
— Hollywood Critics Association (@HCAcritics) July 1, 2022
आधीच ‘आरआरआर’ या चित्रपटाचे संपूर्ण सिनेसृष्टीत चांगलेच कौतुक होत आहे. यातच आता आरआरआर चित्रपटाने हॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांच्या दिग्गज कलाकृतींना मागे टाकत नामांकित पुरस्कार पटकावला आहे. टॉप गन मेवरिक आणि बॅटमॅन या सारख्या लोकप्रिय सीरिजच्या सिनेमांना मागे टाकत हॉलीवुड क्रिटिक्स असोसिएन तर्फे दिला जाणारा HCA Midseason Award हा पुरस्कार यंदा उपविजेता म्हणून ‘आरआरआर’ या चित्रपटाने पटकावला आहे. तर मुख्य विजेता म्हणून ‘एवरीवेअर एवरीवेअर ऑल अॅट वन्स’ या हॉलिवूड चित्रपटाने बाजी मारली आहे. एचसीएने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे
यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ हा चित्रपट २०२२ सालातील आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांच्या यादीत मानाच्या पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर या लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांसोबत अजय देवगण आणि आलिया भट्ट या बॉलिवूड कलाकारांनीही काम केले आहे. ‘आरआरआर’ने ‘बाहुबली 2’चादेखील रेकॉर्ड मोडला आहे. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवतोय. हॉलिवूडच्या ‘द बॅटमॅन’ आणि ‘टॉप गन मेवरिक’ या सिनेमांना मागे टाकत सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमाचा मानदेखील या चित्रपटाने मिळवला आहे.
Discussion about this post