हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत आणखी एक दर्जेदार कथानक येऊ घातलं आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे अलीकडेच मोशन पोस्टर रिलीज झाले. तेव्हापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यांनतर आता हा चित्रपट चर्चेत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, चित्रपटाच्या शूटिंग सेटवर प्लॅस्टिकला पूर्ण बंदी आहे. शूटिंगदरम्यान एकही प्लॅस्टिकची बाटलीही वापरण्यात आलेली नाही. होय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही याची माहिती पूर्वा पंडितने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
पूर्वाने अधिकृत सोशल मीडिया फेसबुकवर हि पोस्ट केली आहे. तिने लिहिलंय कि, फिल्म ‘ एकदा काय झालं ‘ स्टोरीज ..टिकाऊपणाच्या दृष्टीने प्रवास करण्याचा केलेला एक सुंदर प्रयत्न आमच्या ‘ एकदा काय झालं ‘ च्या सेट वर प्रोडक्शन टीमकडून करण्यात आला . त्यात नेहमी वापरत असलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स न वापरता स्टीलच्या बॉटल्स प्रत्येक माणसाला त्याचं नाव टॅग करून देण्यात आल्या . त्या निमित्ताने प्लॅस्टिकचा होणारा अमाप वापर टाळता आला. अश्या छोट्या छोट्या उपक्रमातून आपण पृथ्वीसाठी काही करत राहिलो तर सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून तिला निरोगी ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकू ! तर अश्या बऱ्याच उपक्रमांनी युक्त असलेली अशी आमची फिल्म ‘ एकदा काय झालं ‘ नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा !
या पोस्टसोबत पूर्वाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण ‘एकदा काय झालं’ चित्रपटाची टीम दिसतेय. प्रत्येकाच्या हातात पाण्याची बॉटलही दिसतेय. फक्त हि बॉटल प्लॅस्टिकची नसून धातूची आहे. काय..? आहे का नाही कौतुकास्पद. म्हणून नेटकऱ्यांनी देखील कलाकारांच्या कृतीचे भरभरून कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले कि, व्वा खूप छान उपक्रम. इतरांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. तर अन्य एकाने लिहिले कि, तुमच्याबद्दल आणि तुमच्या टीमबद्दल खूप विचारशील, ते चालू ठेवा… छान हावभाव.
आगामी चित्रपट ‘एकदा काय झालं’ हा येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि संगीत अशी तिहेरी जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. या चित्रपटात त्यांनी विविध भावनांच्या माध्यमातून एक गोष्ट तयार केली आहे. हा विविध भावनांची उकल करणारा सिनेमा आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने पहावा इतकी आकर्षकता नक्कीच या कथानकात आहे.
Discussion about this post