हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. खूप वर्षांनी तिची पुन्हा भेट होणे हि भावनाच किती भारावणारी आहे. असेच गोड कथानक घेऊन हि मालिका प्रसारित झाली आणि प्रेक्षकांना या कथानकाची भुरळ पडली. यानंतर आता आनंदाची बाब अशी कि या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या १०० भागांसह मालिकेतील कलाकार आता प्रत्येक घरातील व्यक्तीसाठी खास झाली आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेचा टीआरपी एक एक पाऊल पुढे घेत चालला आहे.
सध्या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले सौरभ पटवर्धन अर्थात स्वप्नील जोशी आणि अनामिका दीक्षित म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच प्रेम बहरताना दिसतंय. सौरभने अनामिकाला प्रेमाची साद घातल्यानंतर अखेर अनामिका सुद्धा प्रेमात पडलीच. अलीकडच्याच भागांमध्ये अनामिकाने सौरभच्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे दाखविले. यानंतर आता अनामिका आणि सौरभ आपल्या नात्याचा पुढे विचार करत असताना अनामिकाची आई कावेरी वादळ बनून आली आहे. त्यात अनामिकाची मुलगी राधा हि तिची प्रायोरिटी असताना सौरभ तिच्या आयुष्यात टिकेल..?
अनामिकाची आई कावेरी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाचा स्वीकार करेल का…? राधा आपल्या आईच प्रेम आणि तिचा मित्र एक नव्या नाट्यासह स्वीकारू शकेल का..? असे अनेक प्रश्न आणि एक रंजन वळण घेऊन या मालिकेने नुकतीच शंभरी पूर्ण केली आहे. अल्पावधीतच या मालिकेने मनोरंजाचा विस्तार वाढवला आहे. आता प्रेक्षकही पुढे काय होणार याचा विचार करत असतील. त्यामुळे शंभरी नंतर आता नॉन स्टॉप हि मालिका चालणार आणि बहरणार असेच या मालिकेचे भविष्य दिसत आहे.
या मालिकेचे शीर्षक गीत जणू प्रेक्षकांसाठी मधुर आणि श्रवणीय साद झाले आहे. तू तेव्हा तशी या मालिकेचे हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर या गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे.
Discussion about this post