Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नवा गडी, नवं राज्य’! ‘त्या’ दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट; पहा नव्या मालिकेचा प्रोमो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Zee Marathi New Serial
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी वाहिनी झी मराठीचा टीआरपी काही बऱ्या क्रमांकावर नाही. पण स्पर्धेतून बाहेर पडेल अशी हि वाहिनी मुळीच नाही. त्यामुळे नेहमी आपल्या प्रेक्षकांना काहीतरी हटके आणि वेगळं देण्याचा या वाहिनीचा अट्टाहास असतो. त्यामुळे आता लवकरच हि वाहिनी एक नवी गोष्ट, एक नवी कहाणी घेऊन येतेय एका नव्या मालिकेतून. होय. झी मराठीवर एक नवी मालिका येतेय. या मालिकेचे नाव ‘नवा गडी, नवं राज्य’ असं आहे. यामध्ये प्रेक्षकांची लाडकी राधिका अर्थात अभिनेत्री अनिता दाते- केळकर एका हटके घोस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या तुफान यशानंतर आता लवकरच अनिता ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव रमा असे असणार आहे. तर तिच्यासोबत तोडीस तोड द्यायला अभिनेत्री साईशा भोईर आनंदी या पात्रातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर पुरुष व्यक्तिरेखेत अभिनेता कश्यप परुळेकर दिसणार आहे. अशी कमाल स्टारकास्ट आणि कमालीचं कथानक असणारी हि मालिका ८ ऑगस्ट २०२२ रोजी सुरु होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

या मालिकेत अनिता साकारत असलेले ‘रमा’ हे पात्र हयात नाही असे दाखवले आहे. त्यामुळे रमाच्या निधनानंतर तिचा पती दुसरं लग्न करतो आणि मग आनंदी या घरात सून होऊन येते. पण गेलेल्या रमाबाई शांत थोडीच बसतील. नव्या सुनेला आणि आपल्या सवतीला छळायची ती एकही संधी सोडत नाही. रमा थेट फोटोतून आपल्या सवतीचा म्हणजे ‘आनंदी’चा गमतीशीर छळ करते. अत्यंत खोडकर अशा भूमिकेत अनिता आपल्याला आहे. या मालिकेतून एक वेगळा विषय पहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून याच्या कॅप्शनमध्ये ‘जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो.. त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट…’ असे लिहिले आहे.

Tags: Anita DateNew PromoUpcoming SerialViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group