हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट सिनेसृष्टीत अत्यंत नामांकित मानला जाणारा दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड यंदा ‘धर्मवीर’ चित्रपटाने पटकावला आहे. त्यामुळे धर्मवीर चित्रपटाच्या टीमच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेलाय असं म्हणायला काही हरकत नाही. ठाणे शहर आणि जिल्ह्यात ज्यांनी शिवसेना हा पक्ष रुजवला त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट बनविण्यात आला. गेल्या १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला उदंड प्रेम दिलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवून कमाई केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकले. यानंतर आता प्रेक्षकांचं प्रेम, समीक्षकांचे कौतुक एव्हढं मिळवल्यानंतर चित्रपटाचा विविध पुरस्कारांनीही गौरव झाला आहे. यंदाचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्कार देखील यंदा याच चित्रपटाने पटकावला आहे. अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्स आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ चित्रपटाची निर्मिती केली. तर प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले. शिवाय या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे या कलाकारांच्या मुख्य आणि महत्वाच्या भूमिका आहेत.
याआधीसुद्धा या चित्रपटाने तुफान पुरस्कार मिळवले आहेत. या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकला दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले कि, ‘हा सन्मान मी आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार!
Discussion about this post