हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता आर. माधवन याने एक आव्हानात्मक आणि अनोखी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची भुरळ तरुणाईपासून अगदी पंतप्रधानांनीही पडली होती. या चित्रपटाची दखल घेऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा संपूर्ण टीम आणि कलाकारांचे कौतुक केले होते. यानंतर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. IMDb ने तर या चित्रपटाला थेट ९.३ इतकं रेटिंग दिले आहे.
https://www.instagram.com/p/CfyceR8jHC5/?utm_source=ig_web_copy_link
आर माधवन याने साऊथ सह बॉलीवूडमध्येदेखील उत्तम कामगिरी केली आहे. ‘रहेना है तेरे दिल में’ पासून मॅडी हा सर्वांचा लाडका अभिनेता झाला आहे. सध्या त्याचा रॉकेट्री हा चित्रपट गाजताना दिसतोय. यामध्ये त्याने इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे. माधवनच्या रॉ़केट्री चित्रपटाचे चाहत्यांनी आणि समीक्षकांनी भरपूर कौतुक केले आहे. या चित्रपटाला IMDb ने ९.३ रेटिंग देणे हि बाब सध्या अभिनेत्यासह संपूर्ण टीमसाठी मोठी बाब आहे. हि बातमी स्वतः माधवनने सोशल मीडियावरुन दिली आहे.
माधवनचा रॉकेट्री हा सिनेमा १ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे भरपूर कौतुक केले जात आहे. ‘आपल्या चित्रपटाला जेव्हा आयएमडीबीने ९.३ रेटिंग दिले तेव्हा अभिनेता माधवन भावूक झाला. त्याने या यशाचे श्रेय चाहत्यांना आणि आपल्या टीमला दिले आहे. आतापर्यत रॉकेट्री चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा हित्रपट एकूण ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तो लवकरच ओटीटीवर येणार असल्याचेही सांगितले आहे.
Discussion about this post