हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगना रनौतच्या नावाचा उल्लेख केला जातो. कोणत्याही विषयावर बेधडक बोलणे कंगना नेहमीच पसंत करते. ज्यामुळे ट्रोलिंग आणि वाद तिच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बेक्कार आदळला. पण कंगनाने नाराजी किंवा हार मानलेली नाही. आता ती एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘इमरजन्सी’ असे असून या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची आव्हानात्मक भूमिका साकारतेय. या चित्रपटाचा हटके टिझर नुकताच रिलीज झाला आहे. (Emergency)
या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर कंगनाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. हा टीझर शेअर करताना तिने एक जबरदस्त कॅप्शन लिहिले आहे जे चर्चेत आहे. तिने लिहिलंय कि, ‘Presenting ‘Her’who was called ‘Sir’ .. म्हणजेच ‘हि अशा स्त्रीची कहाणी आहे जिला लोक सर म्हणत होते’. (Emergency) या टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी.सी १९७१ असे लिहिलेले दिसत आहे. हि कथा फारच रंजन असेल असे टीझरवरून वाटत आहे. ‘इमरजन्सी’ चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती हि स्वतः अभिनेत्री कंगना रनौतने केली आहे. तर चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद याचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे.
इमर्जन्सी हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. शिवाय टीझर पाहिल्यास समजते कि, या चित्रपटाचे कथानक देशावर आलेली आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांनी त्यावेळी घेतलेले धाडसी निर्णय यावर आधारित आहे. मात्र हा चित्रपट काय कहर करणार ते सांगता येणे कठीण आहे.. कारण कंगना कायमच कॉँग्रेस विरोधी भूमिका घेत आली आहे. त्यामुळे चित्रपटात काय दाखवतील याबाबत प्रेक्षकही उत्सुक आहेत. सध्या तरी या चित्रपटातील कंगनाचा पहिला लुक समोर आला आहे आणि या लूकमुळे एका क्षणासाठी इंदिरा गांधी यांची आठवण जनतेला झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. (Emergency)
Discussion about this post