Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘…ह्यो मानूस माझा ‘स्ट्रेसबस्टर’ हाय’; किरण मानेंची मंत्रमुग्ध करणारी व्हिडीओ पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दररोजची काम, जीवनशैली यातून येणारा ताण, तणाव दूर सारून पुन्हा जोमाने आणि नव्याने काम करायचं असेल तर एखादा स्ट्रेसबस्टर हवाच नाही का..? तुमच्याही आयुष्यात असेलच. तसाच स्ट्रेसबस्टर अभिनेता किरण माने यांच्या आयुष्यातही आहे. ज्याला आपण सारेच ओळखतो. प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा आवाज म्हणजे एक वेगळ्याच दुनियेची अनुभूती. त्यांच्या आवाजात हरवून जाण्याची इच्छा कुणाला होत नाही.. किरण मानेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत हरिहरन यांच्यासाठी काही खास शब्द लिहिले आहेत.

किरण माने यांनी एक व्हिडीओ पोस्ट करीत त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘…ह्यो मानूस माझा ‘स्ट्रेसबस्टर’ हाय. कितीबी उदास असलो, टेन्शनमधी असलो तर हेडफोन लावून ‘हरीहरन’चा फोल्डर उघडून गानी ऐकत बसलं की एकदम रिलॅक्स होऊन जातो मी… हरीहरनचा नादखुळा, जादूई आवाज… एकेक भन्नाट हरकती.. डोळे मिटून ऐकत बसायचं नुस्तं.. मन पिसासारखं हलकं होतं ! वीसेक वर्षांपूर्वी पयल्यांदा मुंबईत आलोवतो, तवा अंधेरीला चार बंगल्याला माझ्या पाहुन्यांच्या घरी रहात होतो. तेराव्या मजल्यावर.

पुढे लिहिलं आहे कि, एक दिवस सहज खिडकीत उभा र्‍हायलोवतो, तर शेजारच्या सात मजली बिल्डींगच्या टेरेसवर हरीहरन उभा होता. फिरत-फिरत गानी गुनगुनत होता. जवळच्या मित्राकडं आलावता. त्याला बघून ‘येडा’ झालो. रहावलंच नाय. आवाज दिला. त्यानं वर बघितलं माझ्याकडं आन् हसून हात हलवला! त्याकाळात स्मार्टफोन नव्हते, नायतर ती आठवन कायम जवळ राहिली असती. अजून ते आठवलं तरी लै भारी वाटतं.’ किरण मानेंनी शेअर केलेल्या या व्हिडिओत हरिहरन ‘तू हि रे’ हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत हरिहरन यांच्या गायकीचे आपण चाहते असल्याचे सांगितले आहे.

Tags: Facebook PostHariharanKiran ManeTV ActorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group