Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अंकुश चौधरी घेऊन येतोय, एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी..; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Autograph
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अनेक चॉकलेट बॉय असतील पण ज्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालते तोच खरा हिरो.. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, श्रेयस तळपदे, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे.. आणि… आणि अंकुश चौधरी. अंकुशचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये त्याच्या लव्हेबल मुमेंटसाठी तरुणींचा चाहता वर्ग अक्षरशः तडफडत असतो. पण अंकुशने आजवर फक्त चॉकलेट बॉय किंवा प्रेमवीर म्हणून काम केलेले नाही. तर विविध भूमिकांमध्ये त्याने आपला ठसा उमटवला आहे. यानंतर मोठ्या कारकीर्दीनंतर लवकरच तो पुन्हा एकदा एका गोड प्रेमकथेचा भाग होतोय. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

मराठी अभिनेता अंकुश चौधरी याने सोशल मिडियाच्या माध्यमातून मोशन पोस्टर शेअर केलय. हे मोशन पोस्टर आहे ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाच. यासोबत कॅप्शनमध्ये अंकुशने लिहिलंय कि, ‘एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी… ‘ऑटोग्राफ’, येत आहे ३० डिसेंबर २०२२ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत. या व्हिडिओत अंकुशच्या प्रेमळ आणि सौम्य आवाजातील संवाद ऐकू येत आहेत. ‘काहीही कारण नसताना, कोणतीही ओळख नसताना, काही माणसं भेटतात आणि त्यांची आठवण आपल्या मनावर कायमची कोरून जातात. ती माणसं, ते नाव, त्यांचा तो ठसा कायम जपून ठेवावासा वाटतो, एखाद्या ‘ऑटोग्राफ’ सारखा.. होय.. कारण आपण ऑटोग्राफ मागून घेतो .. जपून ठेवण्यासाठी.. कायमचं.. ‘ असे हे संवाद आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

‘ऑटोग्राफ’ या आगामी नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. तर येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी जगण्यावर प्रेम करायला लावणारी हि प्रेमकहाणी आपल्या भेटीला येणार आहे. अंकुशने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कधी प्रेमळ सखा तर कधी बिंधास्त दोस्त, इतकाच काय तर कधी तो धूरंधर राजकारणीसुद्धा झाला. यानंतर लवकरच तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेतून महाराष्ट्राला वेड लावताना दिसणार आहे. त्याच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. तर ‘दगडी चाळ २’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अशातच अंकुश एका नव्या प्रेमकथेतून पुन्हा एकदा प्रेमात पाडायला येतोय हि बातमी त्याच्या चाहत्यांसाठी फारच स्पेशल ठरली आहे.

Tags: Ankush ChoudhariInstagram PostMotion PosterUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group