हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आगामी चित्रपट पोन्नियन सेल्वम हा चोल साम्राज्याच्या संघर्षावर आधारित असून येत्या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या चित्रपटातून बॉलिवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या कमबॅक करत आहेत. तिचा यातील राणी नंदिनीचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून ती चांगलीच चर्चेत आहे. पण वाईट बातमी अशी कि, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील एका चूकीमुळे कोर्टाने मेकर्सला नोटीस बजावली आहे. अशी माहिती मिळतेय.
Ponniyin Selvan: रिलीज से पहले ऐश्वर्या राय की फिल्म पर लगा ग्रहण, कोर्ट ने इस वजह से मणिरत्नम को भेजा नोटिस#PonniyinSelvan #PonniyinSelvanMovie #Maniratnam #ChiyaanVikram #AishwaryaRai #PonniyinSelvanControversyhttps://t.co/YLEt34EdWs
— Bharat Kumar Tiwari 🗨️ (@bharatbkt) July 19, 2022
हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी विविध भाषांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता मणिरत्नम आणि चियान विक्रमला कोर्टाने नोटीस बजावली आहे. हा चित्रपट भारतावर १५०० वर्ष राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याच्या कथेवर आधारित आहे. परंतु चोल या वंशाची ही कथा चित्रपटात चूकीच्या पद्धतीने लोकांसमोर दाखविल्याचा आरोप एका वकिलाने केला आहे. या कथेतील तत्थ्यांचा तपास करण्यासाठी कोर्टाद्वारे वकिलांनी स्पेशल स्क्रिनींगची मागणी केली आहे. या स्पेशल स्क्रिनींगमध्ये कथेतील इतिहासाचा अभ्यास केला जाईल आणि तपासणी करण्यात येईल.
या चित्रपटात चोल वंशाबाबत असं काही दाखवलं असेल ज्याचा खऱ्या कथेशी संबंध नाही, असा संशय सेल्वन वकीलाने व्यक्त केलाय. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चित्रपट विविध कारणांसाठी चर्चेत आला. पण आता कोर्टाच्या नोटिशीनंतर जास्तच चर्चेत आलाय. ऐश्वर्याचा मनमोहक लूक, विक्रम आणि तृषा यांच्या चित्रपटातील भूमिका सगळं काही हटके आहे.
शिवाय ग्राफिकमूळे स्क्रीन लक्षवेधी वाटत आहे. या चित्रपटाबद्दल सांगायचं म्हणजे, हा चित्रपट बिग बजेट असून ५०० कोटींची मोठी गुंतवणूक आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसह तमिळ, मल्याळम कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी चालू वादातून या चित्रपटाचे बाहेर पडणे आवश्यक आहे.
Discussion about this post