हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बेधडक, बिंधास्त, बोल्ड आणि अतरंगी राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सची लाडकी राखी नेहमीच काही ना काही मसाला देते. कधी चित्र विचित्र स्टाईल तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिच्याबद्दल सतत बोललं जात. विविध सेलिब्रिटी आणि चालू परिस्थितीवर ती अनेकदा व्यक्त होताना दिसते. पण सध्या तिने तिचा मोर्चा मोदींकडे वळवला आहे. होय. काही दिवसांपूर्वी राखीने कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस घेतला. मात्र यानंतर तिचं आयुष्य उद्धवस्त झालं असं ती म्हणतेय. ती असं का म्हणतेय ते जाणून घेऊया.
राखी सावंत ही सोमवारी मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी उपस्थित सेलिब्रिटी फोटोग्राफर्सच्या कॅमेराने तिला घेरलं. मग काय..? विविध प्रश्न आणि विविध उत्तरे सुरु. दरम्यान तिने बोलता बोलता थेट पंतप्रधान मोदींवर आरोप करायला सुरुवात केली. ती म्हणाली कि, ‘मोदीजी तुम्ही माझे आयुष्य उद्धवस्त केले आहे. मी गेल्या दोन रात्रींपासून झोपलेली नाही. बूस्टर डोस घेतल्यापासून मला झोपचं येत नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे. माझे शरीर वेगवेगळ्या गोष्टी मागत आहे. मी फार अस्वस्थ झाली आहे. बूस्टर डोस घेतल्यापासून माझ्या शरीरात काय सुरु आहे हेच मला कळत नाही. माझा चेहरा पूर्ण सुजलेला आहे. मला अजिबात झोप येत नाही. माझी अवस्था खूप वाईट आहे. याचे परिणाम पाहून मला वाटते की हे बूस्टर इंजेक्शन ६०, ७०, ८०, ९० वयाच्या व्यक्तींना द्यायला हवे. ज्यांना चालता-फिरता येत नाही.’
पुढे म्हणाली कि, ‘मी बूस्टर डोस घेतल्यापासून अगदी वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा विचार करुच शकता. ‘मोदीजी, हे इंजेक्शन कसले आहे…? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे’. इतकेच नाही तर राखीने लोकांना हे इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिलाय. राखीने धाडधाड आरोपांची माळ लावून मोदींना आरोपीच्या कठड्यात उभं केलं आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावर नेटकरी देखील विविध प्रतिक्रिया देत आहेत. कुणी मजेशीर तर कुणी ट्रोलिंगच्या हेतूने कमेंट करताना दिसत आहेत.
Discussion about this post