Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दे धक्का 2’च्या निमित्ताने नेहा शितोळेचा नवा प्रवास सुरु; ‘देह पेटू दे’ गाण्याचं पोस्टर आउट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Neha Shitole
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का च्या अभूतपूर्व यशानंतर आता लवकरच दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. खूप दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील स्टार कास्ट तीच असून यात काही नव्या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर इतरांच्या कलेला वाव देखील दिल्याचे दिसून आले आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळे लिखित ‘देह पेटूदे’ हे गाणे ‘दे धक्का २’ च्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. या गाण्याचे पहिले वहिले पोस्टर रिलीज झाले आहे. शिवाय हे गाणं उद्याच रिलीज होणार आहे अशी माहिती या पोस्टरमधून मिळतेय.

 

 

नेहा शितोळेने या गाण्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले कि, खूप मनापासून केलेला एक नवीन प्रयत्न रसिक मायबापा चरणी अर्पण… उद्या महेश मांजरेकर दिग्दर्शित “दे धक्का २” ह्या सिनेमासाठी मी लिहिलेलं आणि हितेश मोडक ह्यांनी संगीतबद्ध केलेलं एक कमाल गाणं तुमच्या हवाली करतो आहोत… ऐका… सांगा कसं वाटतंय… आवडलं आणि नाही आवडलं तरी आपला अभिप्राय नक्की कळवा… धन्यवाद महेश मांजरेकर आणि हितेश मोडक ह्या नवीन प्रवासावर निघण्यासाठीचा उत्साह आणि आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी… माझा हा प्रवास तुम्हाला समर्पित. या पोस्टवर नेहाच्या चाहत्यांनी तिच्या प्रवासासाठी आणि नव्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून अख्खा महाराष्ट्र गाजवताना दिसेल. या चित्रपटात मेधा मांजरेकर, मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अभिनेते प्रवीण तरडेसुद्धा दिसणार आहेत. तर या चित्रपटाच्या निमित्ताने नेहा शितोळेचे पहिलेच गाणे प्रेक्षकांसमोर येत आहे. नेहा शितोळे सोशल मीडियावर सक्रिय असून ती एक उत्तम कवयित्री आहे हे आपण जाणतोच. कारण सोशल मीडियावर ती नेहमीच विविध कविता पोस्ट करून आपल्या चाहत्यांच्या मेहफिलीत कौतुक मिळवताना दिसते. नेहा शितोळे हि बॉग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती असून तीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारल्या आहेत. यामुळे तिचा असा वेगळा चाहता वर्ग आहे.

Tags: Big Boss Marathi Famede dhakka 2Neha ShitoleUpcoming SongViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group