हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या काही दिवसांपासून हास्यजत्रेने आणि हास्यवीरांनी छोटा ब्रेक घेतला आहे पण लवकरच ते परत येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. या छोट्या पडद्याच्या माध्यमातून अनेकांनी मोठं नाव कमावलं. त्यापैकी एक म्हणजे दत्तू मोरे. त्याने समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर अशा अनेक हास्यवीरांसोबत हजास्यजत्रेचा मंच नुसता गदागदा हलवला आहे. प्रेक्षक अक्षरशः लोळून लोळून हसतील एव्हढा आनंद दत्तूने प्रत्येकाला दिलाय. अशा या कलाकाराचं नाव जेव्हा त्याच्याच राहत्या चाळीला दिलं जातं तेव्हाच आनंद काय असेल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही.
अगदी २ आठवड्यापुर्वीची हि गोष्ट आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागातील एका चाळीचं नाव अचानक बदललं आणि एका कोऱ्या करकरीत पाटीवर नवं नाव ‘दत्तूची चाळ’. होय. या चाळीला चाळकऱ्यांनी चक्क आपल्या दत्तूचं नाव दिलंय. आज लोक या चाळीला याच नावाने शोधत जातात. दत्तूने या चाळीला एक वेगळी ओळख दिली आहे. दत्तू जेव्हढा हास्यजत्रेचा लाडका आहे तेव्हढाच रसिक मायबापांचा देखील आहे. इतकच नव्हे तर या चाळीतील प्रत्येक माणसाची दत्तू जान आहे. पैशाने नाही रे.. मानाने श्रीमंत व्हा शिकवणारी यांची वृत्ती खरंच वाखडण्याजोगी आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरदत्तूने याबाबत पोस्ट शेअर करताना लिहिलं होत कि, ‘खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण काही वेगळंच प्रेम आहे आमच्या नगरातल्या लोकांचं माझ्यावर (चाळीतल्या लोकांच तर फारच) आणि त्या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन ज्यांनी आज पर्यंत मला आज एवढं प्रेम दिलं,कौतुकाची थाप दिली.असच प्रेम करत रहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच ऊर्जा येते आणि यात अजून एक फार मोठा वाटा आहे तो आमच्या “महाराष्ट्राची हास्य जत्रा”( MHJ )फॅमिलीचा आणि सोनी मराठी चॅनलचा.’
दत्तूच्या यशाबद्दल आणि त्याच्या प्रतिभेबद्दल बोलताना चाळकरी तसेच त्याचे कुटुंबीय म्हणाले कि, ‘आम्हाला दत्तूने इतक्या कमी वयात इतकं काही केलय हेच फार मोठं आहे. हे सगळं यश त्याच आहे त्याच्या मेहनतीचं आहे. आम्हा सगळ्यांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. असाच कायम राहील. आमचे आशीर्वाद आहेतच पण त्याच्या मेहनतीचं फळ त्याला असच मिळत राहो हि प्रार्थना. त्याच्या कलेला वाव देण्यासाठी आम्ही हास्यजत्रा टीम आणि वाहिनीचे देखील मनापासून आभारी आहोत. हे नाव बदलून आम्ही केवळ त्याच कौतुक केलं आहे बाकी सगळं काही त्याने स्वतः कमावलं आहे.’
Discussion about this post