हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणवीरच्या न्यूड फोटोंमुळे वातावरण तापलं आहे. कुणी ट्रोल करतंय कुणी समर्थन. पण या सगळ्यात आक्रमक सामाजिक कार्यकर्त्याकडून अखेर मुंबईत चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या एफआयआर नंतर आधीच रणवीरच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच आता पुण्यातसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय त्यांनी पुण्यात पोलीस तक्रार दाखल करून घ्यावी अशी मागणी केली आहे.
पुणे शहरात मनसेने रणवीर विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. हिंदू संस्कृतीचा अपमान करून नव्या तरुण पिढी भरकटण्यास भाग पाडणे असे आरोप करीत मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे यांनी हि मागणी केली असून अभिनेत्यावर कलम ३५४,५०९, ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करा असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार रणवीरचे हे वर्तन शोभादायक नाही.
मनसे शारीरिक सेनेचे पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे यांनी रणवीरच्या फोटोशूटचा निषेध करताना अभिनेत्यावर आरोप लावले आहेत. सोशल मीडियावर न्यूड फोटो प्रसिद्ध करून त्याने हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे. शिवाय स्त्रियांना हे फोटो पाहताना लाज वाटेल अशा पद्धतीचे हे फोटोशूट करण्यात आलेले आहे. रणवीरचे हे फोटोशूट म्हणजे सध्याच्या तरुण वर्गाला बिघडण्याची व वयात येणारी लहान मुलांवर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवित आहे.’ असा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसेने यावेळी केली.
Discussion about this post