हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची ओढ अशी आहे कि तिच्यात विलीन झाल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. आपण अनेकदा पाहिले असेल विविध भाषेत सिने इंडस्ट्री गाजवलेले दिग्गज कलाकार मराठी सिनेसृष्टीच्या ओढीने मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसतात. पण कधी कोण्या राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहिलंय का..? नाही..? तर आता हि इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण राजकीय क्षेत्रातील दोन दिग्गज नेते आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
‘राष्ट्र – एक रणभूमी’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन महामारीमुळे लांबणीवर गेले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २६ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट राज्यातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे असे सांगण्यात आले आहे. या चित्रपटात कवी मनाचे नेते शीघ्रकवी अशी ओळख असलेले रिपाईचे नेते रामदास आठवले आणि शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख असलेले कोल्हापूरचे माजी खासदार राजू शेट्टी हे वेगळ्या भूमीएकट दिसणार आहेत.
आज पर्यंत आठवले विविध ठिकाणी विविध विषयांवर कविता करताना दिसले तर वेळोवेळो अन्य पक्षांवर टीकाही करताना दिसले. याशिवाय शेट्टी अनेक शेतकरी आंदोलनात रस्त्यापासून संसदेपर्यंत गोंधळ घालताना दिसले. यानंतर आता हे दोन्ही दिग्गज नेते एकाच चित्रपटात दिसणार आहेत हि मोठी बाब आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात राजू शेट्टी आणि रामदास आठवले यांच्यासह सिनेइंडस्ट्रीतील बडे कलाकार दिसणार आहेत. यात विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, संजय नार्वेकर, गणेश यादव, रीमा लागू हे कलाकार दिसणार आहेत.
Discussion about this post