हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक मालिका म्हणजे चला हवा येऊ द्या. गेली कितीतरी वर्ष हा शो प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसवतो आहे. हास्यवीर भालचंद्र कदम म्हणजे आपला लाडका भाऊ, कुशल बद्रिके म्हणजे कुशल्या, भारत गणेशपुरे सिनिअर, सागर कारंडे जुनिअर आणि चुलबुली श्रेया बुगडे या कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला एक वेगळाच उच्चांक दिलाय. मुख्य म्हणजे या सगळ्यांचा टोटल गुरु म्हणजे डॉ. निलेश साबळे ज्याने डॉक्टरकी लोकांना हसवून सिद्ध केली आहे. हि संपूर्ण टीमचं कमाल आहे. सध्या श्रावण महिना सुरु झाला आहे आणि या महिन्यात हास्यविरांची हि श्रावण स्पेशल कविता ऐकली नाही तर श्रावणाची मजाच नाही.
‘चला हवा येऊ द्या’च्या एका भागात या हास्यवीरांनी एंटरटेनमेंटचा धमाका हा सीजन गाजवला. गटारी पहाट अशा एक स्किटमध्ये त्यांनी आगामी श्रावणासाठी एकल सॉलिड गाणं तयार केलं होत. ज्याचे बोल होते… श्रावण का महिना, लोक खात नाहीत मटण.. जिर्र्याची फोडणी घालून बायको करते भात वरण’. या गाण्याने प्रेक्षकांना हसवून हसवून अक्षरशः दमवलं. दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लोक यावेळी उपस्थित होते. यात गायक आनंद शिंदे, लावणी साम्राज्ञी मेघा घाडगे, अभिनेता संदीप पाठक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री मानसी नाईक, गायिका रेश्मा सोनावणे उपस्थित होते.
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करायला येत असतात. मुख्य म्हणजे केवळ मराठी सेलिब्रिटी नव्हे तर बॉलिवूड आणि अगदी दाक्षिणात्य सेलिब्रिटी देखील या शोच्या मंचावर आवर्जून उपस्थित राहतात.
नुकताच या शोचा नवा सेट उभारण्यात आला आहे. तर काही तोडीचे कलाकार देखील कार्यक्रमात सहभागी करण्यात आले आहेत. गेल्या काही काळात मालिकेचा टीआरपी पडतोय असं वाटत होत. पण आता पुन्हा एकदा जोशात हे कलाकार लोकांना हसवायला सज्ज झाले आहेत.
Discussion about this post