हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर नुकतीच महिलांसाठी राखीव मालिका सुरु झाली आहे. हि मालिका आहे ‘बस बाई बस’. अगदी काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. येत्या आठवड्यात या मंचावर एक खास आणि प्रसिद्ध व्यक्ती येणार आहे. जिला सगळेच ओळखतात. हि व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस. होय. अमृता फडणवीस ‘बस बाई बस’च्या आगामी भागात येणार आहेत. नुकताच याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या भागात अमृता ‘मला मामी हाक मारल्यावर मज्जा येते’ असं म्हणताना दिसणार आहेत.
अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर एक ओळख आहे ती म्हणजे मामी. देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असे बोलले जाते. तर तसं पाहिलंच मग न्यायाने अमृता यांना मामी अशी ओळख देण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना या ओळखीबद्दल काय आणि कसं वाटतं असं विचारते. अखेर अमृता म्हणाल्या कि, ‘मला तर मामी म्हणून संबोधतात ते फारच आवडतं.मला फारच मजा येते.’ याशिवाय प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवादसुद्धा यात पाहायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधत अमृता म्हणतात कि, ‘अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?’ मागच्या काळात महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात आसाम, गुवाहाटी, सुरत अशी या शहरांची नाव जोरात चर्चेत होती.
https://www.instagram.com/tv/CgyTQVEJ6ND/?utm_source=ig_web_copy_link
अमृता फडणवीस या भारी हौशी आहेत. त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. यात त्यांना गायनाची अत्यंत आवड आहे. त्यामुळे विविध गाण्यांनी त्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करताना दिसतात. अलीकडेच त्यांच्या रिप्राईज गाण्याने सगळ्यांना सरप्राईज केलं होत. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांना सोशल कार्यक्रमांना उपस्थिती लावायला नेहमीच आवडते. त्यामुळे विविध कार्यक्रमात त्या आवर्जून दिसतात. आतापर्यंत या कार्यक्रमात पहिल्या भागात सुप्रिया सुळे तर दुसऱ्या भागात अमृता खानविलकर येऊन गेल्या आहेत.
Discussion about this post