हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून रिंकू आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असल्यामुळे तीच फॅनफॉलोईंग मोठ्या संख्येत आहे. रिंकू राजगुरूंच्या इंस्टाग्रामवर ६ लाखाहून जास्त लोक फॉलो करतात. त्यामुळे रिंकूने सवयीप्रमाणे सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर लाईक्स तसेच कमेंट्सचा पाऊस पडला नाही तर नवलच.
सध्या अभिनेत्री रिंकू राजगुरूंच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपले पेशवाई अंदाजात फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूचा घरंदाज अंदाज नेटकऱ्यांना भारीच भावला आहे. मुख्य म्हणजे रिंकूने परिधान केलेली साडी हि दहावारी साडी आहे. या निळ्याशार पेशवाई दहावार साडीत रिंकूचे सौंदर्य अगदी गुलाबासारखे खुलले आहे.
त्यात पेशवाई पद्धतीचे दागिने, नाकात नथ आणि खांद्यावर उपरणं असा काहीसा रिंकूचा पेहराव आहे. रिंकूने नेसलेली दहावारी साडी हि रॉयल तष्ट यांनी डिझाईन केलेली आहे. तर तिच्या अंगावरील पेशवाई दागिने हे जिजा कलेक्शन मधील आहेत.
अभिनेत्री रिंकू राजगुरूंच्या नागपंचमी सणाच्या निमित्ताने हे सुंदर फोटोशूट केले होते. याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्या चाहत्यांनी यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. रिंकूचा हा साज तिच्यावर प्रचंड खुलून दिसतो आहे. तिच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावांचे कौतुक केले आहे.
इतकेच नव्हे तिने केलेला पेहराव आणि तिच्या अंदाजावर अनेक तरुण घायाळ झाले आहेत. रिंकू मुळातच दिसायला फार सुंदर असल्यामुळे ती कोणत्याही आऊटफिटमध्ये सुंदर दिसते आणि ती असे विविध फोटोशूट नेहमीच शेअर करताना दिसते.
Discussion about this post