हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर ‘मासूम सवाल’ हा चित्रपट आणि त्याचे पोस्टर चांगलेच चर्चेत आहे. हा चित्रपट महिलांच्या मासिक पाळीवर आधारित कथानकावर आहे. याच्या पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे सॅनिटरी पॅडवर हिंदू देवता श्रीकृष्णाचा फोटो दिसतो आहे. यामुळे सोशल मीडियावर हे पोस्टर वादाचा विषय झाला आहे. यानंतर वाद टोकाला पोहचून आता या चित्रपटाचा तीव्र निषेध करत दिग्दर्शकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अमित राठोड यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि नक्षत्र 27 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर ‘लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या’चा आरोप करीत साहिबाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
याविषयी बोलताना अमित राठोड म्हणाले कि, ‘मासूम सवाल या चित्रपटात लोकांच्या भावना दुखावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने एक वादग्रस्त पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यामध्ये मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर भगवान श्री कृष्णाचा फोटो लावण्यात आला आहे.
५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींनाही दाखवण्यात आला आहे. यामुळे राठोड यांनी साहिबााबाद पोलिसांत लेखी तक्रार देत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचं पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रदीप त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.
मासूम सवाल या चित्रपटाच्या पोस्टरवरील वाद हा दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाला होता. हा वाद संपला तर नाही मात्र आणखीच चिघळला आणि या दरम्यान काही संघटनांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना धमकीही दिली होती. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर अनेक अभिनेत्यांसह भगवान श्री कृष्णाचा फोटो अगदी स्पष्ट दिसत आहे. यामुळे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप वारंवार केला जात होता. मात्र तरीही पोस्टरमध्ये काहीही बदल केला नाही आणि अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post