हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध कला कृतींमधून आपली छाप पडणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज निधन झाले आहे. हि बातमी सिनेसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते 64 वर्षाचे होते. प्रदीप यांनी आपल्या दमदार अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
प्रदीप यांचे निधन म्हणजे मराठी सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. अभिमानाने मिरवावे असे पारिजात व्यक्तिमत्व असणारे प्रदीप पटवर्धन आज आपल्यात नाहीत हि फार मोठी पोकळी आहे जी भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. प्रदीप पटवर्धन म्हणजे मनातील भावना दाबून चेहऱ्यावर हसू ठेवणारा एक अवलिया, मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांना विसरणं इतकं सोप्प नाही.
अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाची एक लेव्हल जादा होती. त्यांचा अभिनय, बोलण्याची शैली, हसवण्याचा कला सगळं कास मंत्रमुग्ध करणार होत. त्यांचे रंगभूमी आणि सिनेक्षेत्रासाठी मोठे योगदान आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक विनोदी, गंभीर आणि लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं त्याच्या जाण्याने डोळ्यात अश्रूंचा महापूर येणारच ना. त्यांच्या पहिल्या प्रयोगाला जेव्हढ्या जोरात टाळ्या वाजल्या होत्या त्या टाळ्यांचा कडकडाट आजही कायम आहे आणि प्रदीप पटवर्धन यांच्यासारखा कलाकार आजरामर सिनेसृष्टीत आहे..राहील आणि राहणार.!
Discussion about this post