हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावरील वातावरण पेटवणारी अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिची ग्लॅमरस स्टाईल पाहून अनेकदा चाहते अवाक होतात. पण यावेळी मौनी एकटी नाही तर तिच्या पतीसोबत अर्थात सुरज नांबियार सोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे. सुरजचा वाढदिवस सेलिब्रेट करताना तिने शेअर केलेल्या फोटोत ते एकमेकांना किस करतानाही दिसले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरही रोमांच आला असेल यात काहीच शंका नाही.
मौनी आणि सुरज नांबियार यांनी लग्न केल्यानंतर अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. मात्र यावेळी थेट किस करत लिपलॉक केल्याचा हा फोटो व्हायरल झाल्याने हे जोडपे जास्त चर्चेत आहे. हे खास क्षणांचे फोटो शेअर करण्यामागे आणखी एक कारण दडलं आहे. ते म्हणजे मौनीचा पती सुरज नांबियारचा वाढदिवस. ८ ऑगस्ट रोजी सुरजचा वाढदिवस होता आणि म्हणून एक खास नोट पोस्ट करत मौनीने हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंसह मौनीने लिहिले आहे कि, ‘जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा… माझ्या आयुष्य़ात मोठा आनंद आणि समाधान घेऊन येणाऱ्या सुरजला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी अनंत काळासाठी तुझ्या पाठीशी उभी आहे. तू माझे सर्वस्व आहे. मी खूप नशीबवान आहे की, मला तू भेटलास..’ मौनीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेकांनी त्यांच्यातील प्रेम पाहून ते असंच फुलत राहूदे असे आशीर्वाद दिले आहेत.
याआधी नुकतेच मौनीचे लॉन्ग गाऊनमधील बोल्ड फोटो व्हायरल झाले होते. या फोटोतही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय मौनी लवकरच आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जून यांच्यासोबत ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post