हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना राजू यांना अचानक भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आल्याचे समोर आले. यानंतर आज हेल्थ अपडेटनुसार त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत.
#UPDATE | Comedian Raju Srivastava is on ventilator at AIIMS Delhi, he is responding to clinical treatment: Sources
He was admitted here yesterday after he experienced chest pain and collapsed while working out at the gym. He underwent angioplasty later.
(File photo) pic.twitter.com/52YIqQVom0
— ANI (@ANI) August 11, 2022
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बरी होतेय असं वाटत असतानाच आता त्यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहते चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये कसरत करत असताना अचानक छातीत दुखू लागले. दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडल्याने आजूबाजूच्या लोकांना काहीच समजले नाही आणि त्यांना थेट एम्स रुग्णालयात दाखल केलं गेलं.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव एम्स रुग्णालयातील उत्तम डॉक्टरांच्या टीमच्या निदर्शनाखाली आहेत. डॉक्टरांच्या या टीमने राजू यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ते क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत आहेत असाही डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. दरम्यान राजू श्रीवास्तव यांचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पाल यांनी माहिती देताना सांगितले कि, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.
#BreakingNews | Comedian & actor #RajuSrivastava, 59, suffered a heart attack while working out at a gym in #NewDelhi today pic.twitter.com/ldMcbTZpDg
— Mirror Now (@MirrorNow) August 10, 2022
राजू श्रीवास्तव हे केवळ विनोदी कलाकार म्हणून नव्हे तर उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रसिद्ध कॉमिक रिऍलिटी शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेज’मधून ते प्रकाश झोतात आले. राजू याना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच चाहते चिंतेत पडले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजु श्रीवास्तव उपचार घेत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते शुद्धीत आले आहेत.
Discussion about this post